शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ना मानले त्यांचे फसवे करार काही; डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत 'लोकमत' कार्यालयात रंगला मराठी गझल मुशायरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:13 IST

तरुण-तरुणींच्या विचारातून अशा एकापेक्षा एक गझल पेश होत गेल्या आणि 'लोकमत'च्या कार्यालयातील मुशायरा फुलत गेला.

पुणे : कधीचे मृगजळामागे पळत होतो जरी आपण, खरा तितकाच होता ना पायातला काटा. आता एकत्र वाहिलो तर प्रलय होईल हा, बरे होईल हे की चल करूया वेगळ्या वाटा...तरुण-तरुणींच्या विचारातून अशा एकापेक्षा एक गझल पेश होत गेल्या आणि 'लोकमत'च्या कार्यालयातील मुशायरा फुलत गेला. 'लोकमत बुक क्लब'तर्फे आयोजित या मैफिलीच्या अध्यक्षस्थानी होते खुद्द लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, या मैफिलीत सुरेश वैराळकर, पुण्याच्या अमृता जोशी, नांदेडचे सारंग पांपटवार, रत्नागिरीच्या सांची कांबळे, अकोल्याचे अमित वाघ यांनी सहभाग घेत मैफलित रंगत आणली. किंवा फसव वा फायदा घे तू कसाही, जिवना अधिकार सगळे मी तुझ्या हवाली केले. ही अवस्था कोणती आहे मलाही कळेना, घाव जितका खोल जातो, तेवढी येते उभारी... या शायरीतून त्यांनी शायरीचे खास वैशिष्ट्य असणाऱ्या 'वेदनेला' जणू फुंकर घातली.'अद्याप काळजाशी जपलेत वार काही, शत्रूत मोजते मी माझेच यार काही... ...चर्चा हजार झाल्या नमले कधीच नाही, मी मानले त्यांचे फसवे करार काही... आदी ना शायरीने मुशाफिरी सुरू केली. नांदेडचे सारंग पांपटवार यांनी श्रृंगारातील शेरने सुरुवात करताना म्हटले की, 'परिस्थिती माझीही दुर्धर होती, पण इच्छाशक्तीही जब्बर होती, आतासुद्धा घमघमतो आहे मी, जी कोणी होती ती अत्तर होती... एकेकाळी मीही अमीर होतो.. माझीसुद्धा लफडी सत्तर होती... हा वैराळकर यांनी निवेदन करताना तरुणांच्या गझल या थेट सुरेश भट यांच्या गझलेशी साधर्म्य कशा साधतात हे सांगतानाच प्रत्येक गझलेनंतर एक एक शेर पेश करत राहिले आणि मैफिलीत भटांच्या गझलेची दरवळ वाढत गेली. गरवारे महाविद्यालयातील प्रा. अमृता जोशी यांच्या गझलेने मैफलीला सुरुवात झाली.प्रेम कर  शेर सादर झाला अन् मैफिलीचे वातावरणही अत्तरासारखे सुगंधित झाले. त्या पाठोपाठ त्यांनी शेर ठेवला... उरले नाही कोणालाच रंगाचे कौतुक, जिकडे तिकडे चालले सरड्यांचे कौतुक. बघायला गर्दीला गर्दी जमली आहे, उरले आहे टाळ्यांना टाळ्याचे कौतुक. या गझलेने वास्तवावर चाबूक ओढले गेले. काय कामाचा फणा माझा, वाकलेला जर कणा माझा. घेतले आधी विवेकाने, बघ आता वेडेपणा माझा. वाचली जेव्हा बहीण आम्ही, माज जिरला शिक्षणा माझा.. हा शेर अकोल्याचे गझलकार अमित वाघ यांनी सादर केला. 'दूर माणसे करते सडकी, फार चांगली असते कडकी, हवी तेवढी लाव आग तू शीतल बनते तितकी मडकी. एक दिवस ठरलेला असतो, असे इमारत म्हणते पडकी. फुरसत मध्ये बनली दुनिया, मीच एकटा तडका-फडकी'... अशी गजल सादर केली.रत्नागिरीच्या सांची कांबळे यांनी मैफलीत गझल ठेवताना म्हटले की, जगावा लागतो शब्दातला अवकाशही येथे, विनासायास येते का छटा चिमटीत एखादी. पेशाने तलाठी असणाऱ्या सांची यांनी सरकारी शब्द गझलेत कसा येतो याचे उदाहरण देत म्हटले की, भले सातबारा रिकामा उरो, मला नोंद कुठली दुमाला नको. कथा चार घटकेतली आपली, पुन्हा त्यातही दुरावा नको... या प्रसंगी 'लोकमत'चे समूह संपादक विजय बाविस्कर, संपादक संजय आवटे, सहायक उपाध्यक्ष निनाद देसाई, जाहिरात महाव्यवस्थापक अलोक श्रीवास्तव, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे वरिष्ठ महाव्यवस्थापक पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.सुरेश भट यांच्या आठवणीने विजय दर्डा गहिवरलेगझलकार सुरेश भट यांची गझल ऐकली की मला माझ्या पत्नीची आठवण येते; कारण भट यांचे दर्डा परिवाराशी अगदी जिव्हाळ्याचे नाते होते. माझी पत्नी ज्योत्स्ना हिने सुरू केलेल्या एका सांस्कृतिक मंचच्या उद्घाटनासाठी ते माझ्या घरी आले होते. तेव्हा एकच धमाल झाली होती, ही आठवण सांगताना लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा भावविवश झाले. मुंबईमध्ये ताज हॉटेलमधील जेवण आणि त्यानंतर सीएम साहेबांशी त्यांच्या दालनात झालेली भेट, त्यावेळी असलेले सुरेश भट साहेबांचे बिनधास्त, बेधडक वागणे यांचे किस्सेही दर्डा यांनी सांगितले. असा अवलीया मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रVijay Dardaविजय दर्डाLokmatलोकमतmusicसंगीतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड