शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत तडजोड नको  : विशाल सोळंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:31 IST

गणेश कला क्रीडा मंदिर येथे यंदा पहिल्यांदाच जिल्हास्तरीय पातळीवर मुख्याध्यापक शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी ही परिषद केंद्रस्तरावर घेतली जात होती.

ठळक मुद्देमान्यताप्राप्त सर्व माध्यमांच्या १ ली ते १२ वी पर्यंतचे मुख्याध्यापक, प्राचार्य परिषदेसाठी निमंत्रित

पुणे : शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे भवितव्य उज्ज्वल घडावे यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासन लागेल ती मदत करायला तयार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड मुख्याध्यापकांनी करू नये असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी केले. गणेश कला क्रीडा मंदिर येथे यंदा पहिल्यांदाच जिल्हास्तरीय पातळीवर मुख्याध्यापक शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी ही परिषद केंद्रस्तरावर घेतली जात होती. जिल्हयातील मान्यताप्राप्त सर्व माध्यमांच्या १ ली ते १२ वी पर्यंतचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बालभारती तसेच विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर, उपसंचालक मिनाक्षी राऊत, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ.गणपत मोरे, सहायक शिक्षण निरीक्षक  प्रा. अनिल गुंजाळ, माजी शिक्षण संचालक शिवाजी तांबे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता कशी हेरावी, विद्याार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणावे, विद्याार्थ्यांची शैक्षणिक, शारीरिक, मानसिक गरजा कशा ओळखाव्यात, शाळेत आनंदी वातावरण कसे ठेवावे याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या तसेच एकंदरीत शिक्षणाच्या गुणवत्तावाढीची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. स्वत: च्या मुलांचे भवितव्य घडवताना अनेक अडचणी येतात. तरीही पालक म्हणून त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे विशाल सोळंकी यांनी सांगितले. प्रा. अनिल गुंजाळ म्हणाले, विद्यार्थ्यांचे पाय पाळण्यात दिसतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता काय आहे, यावरून त्याला योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांपेक्षा आज शिक्षणाची वाईट अवस्था झाली असल्याची खंत शिवाजी तांबे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पध्दतीत आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापनात काळानुसार बदल घडणे गरजेचे असल्याचे सांगितले. यानंतर आरटीई प्रवेश तसेच शुल्क अधिनियम कायदा आणि विविध शिष्यवृत्त्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाTeacherशिक्षकEducationशिक्षण