पुणे: आपला विजय होणार आहे,असे समजून सुस्त राहू नका ,मतदार संघात राजासारखे फिरू नका तर प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहचा,अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी मंगळवारी वडगावशेरी मतदार संघातील भाजपच्या नगरसेवकांचे कान टोचले.पुणे लोकसभा मतदार संघात येणा-या सहा विधानसभा मतदार संघापैकी सर्वाधिक मतदार असणा-या वडगावशेरी मतदार संघात गिरीश बापट यांनी मंगळवारी प्रचार फेरी काढल्यानंतर आमदार जगदीश मुळीक आणि स्थानिक भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीस शिवसेनेचे काही नगरसेवकही उपस्थित होते. या मतदार संघातून भाजपच्या नगरसेवक मतदारांना भेटून प्रचार करत नाहीत तर राजा सारखे फिरून प्रचार करत असल्याचे माझ्या कानावर आले आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी स्वत: पुढाकार घेवून कामाला लागावे. ज्या प्रभागातून भाजपला कमी मतदान मिळेल त्याला निष्क्रिय नगरसेवक समजले जाईल,अशा शब्दांत बापट यांनी नगरसेवकांना खडसावले.शिवसेना आणि रिपाईकडून भाजपला मिळत असलेल्या मदतीचा फायदा घेवून एकत्रीपणे काम करून मतदारांच्या घरोघरी जावून प्रचार करा. पुढील दोन दिवसात प्रचारामध्ये बदल झाल्याचे दिसून आले पाहिजे,असे बापट यांनी खडसावले असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.
सुस्त राहू नका प्रचाराला लागा : गिरीश बापट यांनी टोचले नगरसेवकांचे कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 20:14 IST
आपला विजय होणार आहे,असे समजून मतदार संघात राजासारखे फिरू नका तर प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहचा..
सुस्त राहू नका प्रचाराला लागा : गिरीश बापट यांनी टोचले नगरसेवकांचे कान
ठळक मुद्देआमदार जगदीश मुळीक आणि स्थानिक भाजप नगरसेवकांची बैठक