शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
3
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
4
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
5
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
6
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
7
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
8
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
9
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
10
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
11
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
12
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
13
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
14
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
15
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
16
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
17
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
19
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
20
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
Daily Top 2Weekly Top 5

रेडिरेकनर दरांमध्ये कृत्रिम वाढ करू नये; क्रेडाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 04:56 IST

रेडीरेकनरचे दर कायम ठेवल्यामुळे महसुलात तोटा येणार नाही, असे क्रेडाई महाराष्ट्र म्हटले आहे.

पुणे : बांधकाम व्यवसाय विविध कारणांमुळे गंभीर अडचणींना सामोरे जात असल्याने महाराष्ट्र सरकारने यंदा रेडीरेकनरचे दर वाढवू नयेत. उलट, काही ठिकाणी ते कमी केले पाहिजेत. रेडीरेकनरचे दर कायम ठेवल्यामुळे महसुलात तोटा येणार नाही, असे क्रेडाई महाराष्ट्र म्हटले आहे.या संदर्भात संघटनेच्या वतीने धोरणनिर्माते व विधिमंडळ सदस्यांपुढे सादरीकरण करण्यात आले. क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी संघटनेच्या वतीने या संदर्भात निवेदन दिले आहे. बांधकाम उद्योग सध्या विविध कारणांमुळे कठीण काळातून जात आहे. यात रेरा, जीएसटीचा चढा दर, आर्थिक सुधारणा, बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या अडचणी, बाजारातील मागणी व पुरवठा यांतील फरक इत्यादी कारणांचा समावेश आहे. गेल्या वर्षी कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीद्वारे मिळालेल्या अधिकारांचा वापर करून त्यात योग्य ठिकाणी कपात करण्याचीही मागणी केली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. गेल्या ६ वर्षांत ५ वेळा एएसआरचे दर वाढले आहेत. हे दर दुप्पट झाले आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती तशी नसून गेल्या ६ वर्षांत घरांचे दर स्थिर असून मागणीत घट झाली आहे, असेही क्रेडाईच्या वतीने सांगण्यात आले.संघटनेच्या मागण्यासरकारने प्रत्येक मालमत्तेचे एएसआर दर ठरविण्यासाठी शास्त्रीय सूक्ष्मयंत्रणा पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलावीत. एएसआरचे दर तीन वर्षांनीच ठरविण्यात यावेत. सरकारने सरासरी दर प्रणाली पूर्णपणे रद्द करून ती सर्वांत कमी दराच्या आधारे निश्चित करावी.महसूल कमी होणार नाहीवर्ष २०१८-१९ दरम्यानच्या महसुलाचा हवाला देत वरील बाबींची अंमलबजावणी केल्याने राज्य सरकारचा महसूल कमी होणार नाही, असे क्रेडाईने म्हटले आहे. वर्ष २०१८-१९मध्ये एएसआरचे दर कायम असतानाही सरकारचे उत्पन्न वाढले, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग