शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी पूर्ण, केसांचे नमुने घेतले; लवकरच अहवाल मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:50 IST

Pune Crime News : स्वारगेट येथील २६ वर्षीय तरणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीची डीएनए चाचणी केली आहे.

किरण शिंदे

Pune Crime News ( Marathi News ) : पुण्यातील स्वारगेट बसस्थानक येथे दोन दिवसापूर्वी एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांना अटक केली. पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू आहे, आरोपीला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीची डीएनए चाचणी करण्यात आली असून बसमधील केसांचे नमुने गोळा करण्यात आले होते. दरम्यान, आता काही वेळातच डीएनएचे रिपोर्ट समोर येणार आहेत. 

हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

लवकरच पोलिसांना डीएनए चाचणीचा अहवाल मिळणार आहे. एसटी बसमध्ये आरोपी दत्ता गाडे याचे केस सापडले आहेत. केसांचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले असून डीएनए चाचणी करण्यात आली आहे. चाचणी पूर्ण झाली असून आता अहवाल मिळणार आहे. या अहवालामधून पोलिसांना आरोपीविरोधात भक्कम पुरावा मिळणार आहे. 

२५ फेब्रुवारी रोजी सकाळी पुण्यातील स्वारगेट एस टी स्थानकात बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती.  ज्या एस टी बसमध्ये हे कृत्य घडले त्या बस ची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान एस टी बसमध्ये काही केस आढळून आले आहेत.  या केसांच्या सोबत आरोपी दत्ता गाडे याच्या केसांच्या सॅम्पलिंग डीएनए मॅचिंग झाल्याचे बोलले जात आहे.

स्वारगेट प्रकरण: ‘ती’ मेल्यागत पडून राहिली

पीडितेला आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे सांगून आरोपी तिला घेऊन गेला. ती बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाहीये, मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिले. पीडितेने मदतीसाठी आवाजही दिले; मात्र आरोपीने तिचा गळा दाबला. आरोपीने आपल्याल जिवंत सोडावे यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती.

आरोपीच्या खात्यात महिनाभरापासून २४९ रुपये

स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकील न्यायालयात संगनमताने हा प्रकार झाल्याचे सांगतात. त्यावेळी आरोपी दत्तात्रय याने काही पैसे दिल्याचेदेखील सांगितले गेले. तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ २४९ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी अशा परिस्थितीत कुठून पैसे देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

टॅग्स :swargate bus depotस्वारगेट बसस्थानकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस