शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिव्यांगांचं रस्त्यावर झोपून 'हटके' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 21:06 IST

पाच जिल्ह्यांत दिव्यांग हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप 

पुणे : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात दिव्यांग हक्क कायदा व शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेन्द्र सातव यांच्या नेतृत्त्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन उप विभागीय आयुक्त पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने या प्रमुख मागणीसाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी लक्षवेधी उपोषण करण्यात आले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी देवदत्त माने (कोल्हापूर), रामदास कोळी (सांगली), सुरेखा ढवळे (पुणे), सिध्दराम माळी (सोलापूर), मृत्युंजय सांवत, सुरेश पाटील, दत्ता ननावरे, बाळू काळभोर, अनिता कांबळे, दिपक चव्हाण, समिर तावरे, जीवन टोपे दरेकर, संदीप जगताप यांच्यासह बहुसंख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. 

शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर पालकमंञी व तालुकास्तरावर आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ५ टक्के निधी खर्च करनेकामी समिती जिल्हात बहुतांश तालुक्यात गठीत झालेली नाही. समितीच्या बैठका घेण्यात आलेल्या नाही. २१ डिसेंबर २०२० शासन परिपञकानुसार दिव्यांगांना विभक्त राशनकार्ड पिवळे राशन कार्ड दिले जात नाही. दिव्यांग हक्क कायदा २०१६ नुसार २१ प्रवर्गातील काही दिव्यांग प्रवर्गाना दिव्यांग वैदयकीय प्रमाणपञ मिळत नाहीत. संजय गांधी निराधार पेन्शन योजनाचा लाभ मिळण्याकरिता तहसील कार्यालयात दाखल असलेले शेकडो अर्ज प्रकरणे मजुंरी अभावी पडून आहे. घरकुल मिळावे याकरितां अर्ज केलेले शेकडो प्रकरणे जिल्हा परिषद, पंचायत समिति कार्यालयात पडून आहेत. अशा विविध मागण्या यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेDivyangदिव्यांगagitationआंदोलनcommissionerआयुक्त