शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी पाणी संघर्षावर काढणार तोडगा : करणार पाण्याचे न्याय वाटप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 20:57 IST

शहरातील पाण्याच्या कपातीवरुन महापालिका प्रशासन, राजकीय नेते आणि जलसंपदा विभागामध्ये संघर्ष सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमहानगरपालिका-जलसंपदा विभागाची घेणार संयुक्त बैठकचार प्रमुख धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा

पुणे : शहरातील पाण्याच्या कपातीवरुन महापालिका प्रशासन, राजकीय नेते आणि जलसंपदा विभागामध्ये संघर्ष सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महापालिका आणि जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक बोलावली आहे. त्यात पाणी वाटपाचा न्याय तोडगा काढण्यात येणार आहे.  शहराची पाण्याची गरज भागवून जिल्ह्यातील शेतीसाठी आणि उद्योगासाठी खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणातील २९ अब्ज घनफूट पाणी वापरले जाते. सध्या चार प्रमुख धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुण्याला पाणीटंचाई भासणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, टंचाई भासू नये यासाठी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन पाण्याचे नियोजन करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्यासाठी शहरातील सर्वच भागात एकवेळ पाणी सोडण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. तसेच पाणी सोडण्याच्या वेळा देखील निर्धारीत करण्यात आल्या आहेत. त्यावरुन महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी येत्या दोन दिवसांत दोन्ही विभागांची संयुक्त बैठक घेणार आहेत. जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाई भासणार नाही. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन आणि समन्यायी वाटप झाले पाहिजे. धरणांच्या पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग या दोन विभागांच्या अधिकाºयांची बैठक येत्या दोन दिवसांमध्ये घेतली जाईल. शेतीसाठी पाणी सोडण्यात विलंब झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील उर्वरित भागात किती पाण्याची गरज आहे, स्थानिक पाणी परिस्थिती, उपलब्ध पाणीसाठा यावरही बैठकीत चर्चा केली जाईल.--------नवीन मतदान यंत्रावर घेणार प्रशिक्षण वर्गआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच व्होटर व्हेरिफाइड पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. या यंत्राची माहिती देण्यासाठी दर आठवड्याला प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असणार आहे. तसेच मतदार यादीमध्ये महिला मतदारांची संख्या वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका