शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी चौक उड्डाणपूलाच्या भूसंपादनाचे दोन दिवसांत पैसे वाटप : सौरभ राव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 20:29 IST

चांदणी चौकातील बहूचर्चीत दुमजली उड्डाणपूलाच्या भूसंपादनासाठी राज्य शाासनाने १८६ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या निधीतून बांधित लोकांना येत्या दोन दिवसांत वाटप सुरु करण्यात येणार पैसे वाटप व भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरु

पुणे: चांदणी चौकातील बहूचर्चीत दुमजली उड्डाणपूलाच्या भूसंपादनासाठी राज्य शाासनाने १८६ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. हा निधी प्रत्यक्ष मिळण्यासाठी काही दिवस लांगतील. परंतु आत निधी मिळण्याची वाट न पाहता महापालिकेच्या निधीतून बांधित लोकांना येत्या दोन दिवसांत वाटप सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.चांदणी चौक येथे बहुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या उड्डाणपुलाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. मागील वर्षी आॅगस्ट २०१७ मध्ये चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते पार पडले होते. मात्र आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने या पुलाचे काम भूमिपूजनानंतर एक वर्षे झाले सुरू होऊ शकलेले नाही. यासाठी किमान ८० टक्के जागा ताब्यात असल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही, अशी भूमिका महामार्ग प्राधिकरणाने घेतली होती. पुणे महापालिकेने भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या निधी बाबत असमर्थता दाखवल्याने राज्य शासनाने यासाठी मदत करावी, असा प्रयत्न महापालिका व लोकप्रतिनिधी केला. महापालिकेच्या मागणील मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, परंतु नगरविकास खात्याने एकूण मागणीच्या ५० टक्केच निधी द्यावा, असा प्रस्ताव दिला. यामुळे पुन्हा महापालिकेची अडचण निर्माण झाली. परंतु पुणे महापालिकेला शंभर टक्के निधी द्यावा, अशी मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पुणे महापालिकेला चांदणी चौक उड्डाणपुलासाठी १८६ कोटी रुपये देण्याचे अखेर मान्य केले.     याबाबत राव यांनी सांगितले की, शासनाने निधी मंजूर केल्याचा अंतिम आदेश दिला आहे. परंतु, प्रत्येक्ष महापालिकेला हा निधी मिळण्यासाठी काही दिवस जातील. निधी अभावी तब्बल एक वर्ष भूसंपादनाचे काम रखडले आहे. वाहतुकीची समस्या लक्षात घेता आणखी वेळ घालवणे चुकीचे ठरेल. त्यामुळे आता तातडीने महापालिकेच्या निधीतून बांधित लोकांना पैसे वाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. पैसे वाटप व भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरु करण्यात येईल.

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडSaurabh Raoसौरभ रावPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका