अंधजन विकास स्ट्रटतर्फे मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:13 IST2021-09-23T04:13:53+5:302021-09-23T04:13:53+5:30
पुणे : प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदान करून अवयवरूपी जिवंत राहावे. अंधांची काठी बनून आधार व्हावे, असे ...

अंधजन विकास स्ट्रटतर्फे मास्कचे वाटप
पुणे : प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदान करून अवयवरूपी जिवंत राहावे. अंधांची काठी बनून आधार व्हावे, असे प्रतिपादन अंधजन विकास ट्रस्टच्या उपाध्यक्ष राखी रासकर यांनी केले.
अंधजन विकास स्ट्रटतर्फे मास्क वाटपाचा उपक्रम गणपतीच्या दहा दिवसांत राबविण्यात आला. कोरोनाच्या महामारीचे संकट दूर होऊन प्रत्येकाला निरामय आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी दिव्यांग बांधवांनी केली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नारायण देसाई, सतीश कारखानीस, जितेंद्र खडसे, रामचंद्र रांगोळे उपस्थित होते. या कार्यक्रमास दिलीप शेलवंटे यांचे विशेष सहकार्य लाभले.