बुट्टे पाटील यांच्यावतीने सकस आहार पाटील वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:03+5:302021-02-21T04:20:03+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शरद बुट्टे पाटिल मित्र मंडळाच्या वतीने पाईट, पिपरी बु जिल्हा परिषद गटातील कुपोषीत बाळकांना ...

बुट्टे पाटील यांच्यावतीने सकस आहार पाटील वाटप
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शरद बुट्टे पाटिल मित्र मंडळाच्या वतीने पाईट, पिपरी बु जिल्हा परिषद गटातील कुपोषीत बाळकांना " सकस आहार पॅकेट " देऊन वेगळ्या उपक्रमातुन शिवजन्मोत्सव साजरा केला.
यानिमित्त परिसरातील २२ कुपोषीत बालक आढळून आले असून अशा बालकांना २ माहिने पुरेल अशा सुक्या मेव्यांचे पॅकेट तयार करून अंगणवाडी मदतनिसांकडे ते देण्यात आले त्याचा शुभारंभ पाईट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषद सदस्य व भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटिल यांच्या हस्ते पॅकेट वितरित करून करण्यात आला यावेळी सरपंच मंगल भांगे, माजी सरपंच संजय रौंधळ, उपसरपंच गुलाब खेंगले, सागर राळे, पप्पु राळे, गोविंद राळे, कैलास सोनवणे, महादू डांगले, अंगणवाडी सुपरवाझर जिजा गायकवाड, व अंगणवाडी मदतनिस उपस्थित होते. सकस आहारासाठी संजय रौंधळ, सुनिल देवकर, काळुराम पिंजन, सागर राळे, पप्पुराळे, विश्वास बुट्टे पाटील, संतोष कड, शिवाजी डावरे अक्षय शिवेकर, बाबाजी सोंडेकर यांनी सहकार्य केले. .
--
फोटो ओळी : २०पाईट सकस आहार वाटप प्रशंगी बुट्टे पाटील व