मुळशीत अपंगांना वस्तू वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:17+5:302021-06-09T04:13:17+5:30
शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी चार वर्षांपूर्वी मुळशी तालुका दिव्यांग संघटना स्थापन केली होती, त्यामधून ग्रामपंचायत ...

मुळशीत अपंगांना वस्तू वाटप
शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी चार वर्षांपूर्वी मुळशी तालुका दिव्यांग संघटना स्थापन केली होती, त्यामधून ग्रामपंचायत ५ टक्के निधी व शासकीय निधी अपंगांना मिळू लागला आहे. आत्तापर्यंत १२०० अपंग सभासदांना त्याचा लाभ झाला व होत आहे.
यावेळी प्रसंगी जि. प. सदस्य शंकर मांडेकर म्हणाले की, जि. प. मधून अपंग बांधवांना मदत मिळवून देऊ, तसेच बाळासाहेब चांदेरे म्हणाले की, उरवडे येथे कर्णबधिरांसाठी ५ मजली इमारत बांधकाम सुरू आहे. आज कोरोना प्रादुर्भाव काळात दिव्यांग बांधवांना सदर मदत मिळाल्यामुळे अपंग बांधवांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जि. प. सदस्य शंकर मांडेकर, अध्यक्ष बाळासाहेब चांदेरे, सक्षम प्रांताधिकारी ॲड. मुरलीधर कचरे, उपाध्यक्ष शिवाजी भेगडे, सचिव सुरेश भेगडे, सदस्य प्रवीण भरम, दत्ता शिंदे, हरिभाऊ पडाळघरे, दत्ताजी हारवे, गहिनीनाथ नलावडे व लाभधारक बंधू-भगिनी हजर होते. तर घोटवडे सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भीमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य, नवनाथ भेगडे, राजाराम शेळके, संतोष गोडाबे, सारिका खाणेकर, मंगल गोडाबे, निकिता घोगरे, सोनाली मातेरे, भाग्यश्री देवकर, ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर, मयूर घोगरे, संदीप आमले, उत्तम गोडांबे , शिवाजी देवकर सामाजिक अंतर रासखून व मास्क लावून सॅनिटायझर वापरून हजर होते.