छत्रपती सेवकांच्या पतसंस्थेचे ११ टक्के लाभांशाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST2021-07-21T04:08:40+5:302021-07-21T04:08:40+5:30

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तानाजीराव शिंदे होते. तर या सभेसाठी व्हाईस चेअरमन सुमन आगलावे, संस्थेचे व्यवस्थापक भागवतराव घुले ...

Distribution of 11% dividend of Chhatrapati Sevak's credit union | छत्रपती सेवकांच्या पतसंस्थेचे ११ टक्के लाभांशाचे वाटप

छत्रपती सेवकांच्या पतसंस्थेचे ११ टक्के लाभांशाचे वाटप

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तानाजीराव शिंदे होते. तर या सभेसाठी व्हाईस चेअरमन सुमन आगलावे, संस्थेचे व्यवस्थापक भागवतराव घुले आदींसह सर्व संचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक रामचंद्र शिंगाडे यांनी केले. यानंतर संस्थेचे संस्थापक भागवतराव घुले यांनी गेल्या दोन वर्षांचा सविस्तर आढावा घेऊन माहिती दिली. चेअरमन तानाजी शिंदे यांनी स्वागत केले. सभासदांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे समर्पक पद्धतीने दिली गेली. अध्यक्षांनी दिलेली उत्तरे ऐकून सभासदांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. अध्यक्षांनी या वर्षी ११ टक्के डिव्हिडंड जाहीर करून सभासदांना सुखद असा धक्का दिला. अगोदरच सभासदांच्या बँक खात्यात अ‍ॅडव्हान्स म्हणून १० टक्के डिव्हिडंड जमा केलेला आहे. राहिलेला १ टक्का डिव्हिडंड दोन दिवसांत सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे सांगितले. संस्थेचे संचालक गुणवंत वाघमोडे यांनी आभार मानले.

Web Title: Distribution of 11% dividend of Chhatrapati Sevak's credit union