कर्तृत्ववान डॉक्टरांचा सन्मान
By Admin | Updated: July 1, 2014 00:04 IST2014-07-01T00:04:04+5:302014-07-01T00:04:04+5:30
पुणो शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व डॉक्टर सेलच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा केला.

कर्तृत्ववान डॉक्टरांचा सन्मान
>पुणो : पुणो शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व डॉक्टर सेलच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा केला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात पुणो शहरातील प्रतिष्ठित व कर्तृत्ववान डॉक्टरांचा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड़ अभय छाजेड, डॉक्टर सेलचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष डॉ़ मनोज रांका, डॉ़ मधुसूदन झंवर, डॉ़ एस़ एम़ जैन, अॅड़ सुनील गोखले या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
अॅड़ अभय छाजेड म्हणाले, गेली 1क् वर्षे पुणो शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात येणा:या डॉक्टर्स डे निमित्त समाजात सातत्यपूर्ण लोकसेवा व सामाजिक बांधिलकी जपणा:या डॉक्टरांचा सत्कार केला जातो़ डॉक्टरांच्या व हॉस्पिटलच्या समस्या आणि अडचणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला.
डॉ़ मनोज रांका यांनी फायर सेफ्टी, हॉस्पिटल रजिस्ट्रेशन अॅक्ट या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे समस्या कळविल्या असून, लवकरच बैठक आयोजित केली असल्याचे सांगितल़े
या वेळी आय़ एम़ ए़ चे अध्यक्ष डॉ़ अरुण हालबे, जी़ पी़ ए़ अध्यक्ष डॉ़ विलास टाकणो, मेडीजैन अध्यक्ष डॉ़ अरविंद जैन, वाय़ डी़ ए़ अध्यक्ष डॉ़ विकास पोल, तसेच सर्वश्री डॉ़ राजेंद्र भारती, प्रवीण ओसवाल, मनोजकुमार येवले, शशिकांत चव्हाण, नितीन बोरा, जयश्री जैन, गौतम छाजेड, महेंद्र बाफना या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला़
या वेळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, डॉ़ राजकुमार शहा, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, डॉ़ अंबालाल पाटील, डॉ़ नीता माने, डॉ़ मंगेश शिंदे, डॉ़ साबिया पटेल, डॉ़ रवींद्र सोनार, डॉ़ दिलीप सारडा, डॉ़ पंकज शहा, डॉ़ सायली कुलकर्णी आदी उपस्थित होत़े शहर काँग्रेसच्या सरचिटणीस नीता रजपूत यांनी सूत्रसंचालन केल़े (प्रतिनिधी)