शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणूकीपुरते पक्षभेदाचेही विसर्जन, मोहोळ-पवार एकत्र

By राजू इनामदार | Updated: September 17, 2024 18:40 IST

जिलेबी फाफडा आणि वडापाव बरोबरच पेढेही

राजू इनामदार, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी मंडईत लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. काही वेळाने  ग्रामदैवत कसबा गणपती पालखीत विराजमान होऊन तिथे आले. पवार व अन्य राजकीय नेत्यांनी श्रीगणेशाचे पूजन केले व शहराचे वैभव असलेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीस उत्साह व जल्लोषात सुरूवात झाली.

भाविक गुलाल उधळत व ढोल वाजवत उत्साहात पुढे गेले व मागे लोकमान्यांच्या साक्षीने राजकीय चर्चा रंगली. अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र धंगेकर,माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अनंत गाडगीळ माजी महापौर अंकूश काकडे, कमल व्यवहारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी चे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख व काही राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कसब्याची पालखी येण्याआधीच पवार यांच्याह काही नेतेंमंडळी टिळकांच्या पुतळ्याजवळ उपस्थित झाली होती. त्यांच्यात गप्पाही रंगल्या.

पुतळ्याच्या बाजूलाच स्टेज टाकले होते. तिथे ही सर्व मंडळी बसली. अंकूश काकडे यांना अजित पवार आपल्याबरोबर बोलतील की नाही असे वाटत असावे. ते लांबलांब असतानाच अजित पवार यांनी त्यांना जवळ बोलावले व विचारपूस केली. दोघेही बराच वेळ बोलत होते. तिथे बसल्यानंतर पाटील यांनी सांगितल्यावरून एका कार्यकर्त्याने सामोसे आणून सर्वांना दिले  ते खातानाही सर्वांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. अजित पवार मोहोळ यांनी उत्सवात एकत्र येणे ही पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपराच असल्याचे सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने ही मैफल मोडली व सगळे पुढे निघाले.

दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मंडपाजवळ काका हलवाई यांच्याकडेही दरवर्षीप्रमाणे नाष्ट्याचे आयोजन होते, मात्र केंद्रीय मंत्री मोहोळ व चंद्रकांत पाटील येऊन गेल्यानंतर तिथे अजित पवार पोहचले. आल्याआल्या त्यांनी दोघांबद्दल विचारणा केली. त्यावेळी मोहन जोशी म्हणाले कि 'ते येऊन गेले तरी आम्ही आहोत आत्ता तूमच्याबरोबर! त्यातील मर्म ओळखून तिथे हलकीशी खसखस पिकली. अजित पवार यांनी पेढे व फाफडाचा आस्वाद घेतला. 

टिळक पुतळ्याजवळ कमल व्यवहारे यांना.सामोसा दिला जात होता, त्यावेळी अजित पवार चंद्रकांत पाटील यांना म्हणाले. त्यांच्याकडे फार लक्ष दिले नाही तरी चालेल, ते तूमचे मतदार नाहीत.त्यावर पाटील यांनी हसतहसत सांगितले, मला कोल्हापूरहुन इथे पाठवले, आता इथून कुठे पाठवले तर काय घ्या, त्यापेक्षा मी सर्वांचीच काळजी घेत असतो.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनAjit Pawarअजित पवारmurlidhar moholमुरलीधर मोहोळPuneपुणेMahayutiमहायुतीchandrakant patilचंद्रकांत पाटील