नागरिकांना पडतोय निष्कारण भुर्दंड

By Admin | Updated: January 9, 2017 03:17 IST2017-01-09T03:17:16+5:302017-01-09T03:17:16+5:30

पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकताना त्यामध्ये पेट्रोल कमी मिळत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा येत असतात. काही पेट्रोल पंपावर अशा तक्रारीमुळे

Dissatisfaction of the citizens | नागरिकांना पडतोय निष्कारण भुर्दंड

नागरिकांना पडतोय निष्कारण भुर्दंड

फुरसुंगी : पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकताना त्यामध्ये पेट्रोल कमी मिळत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा येत असतात. काही पेट्रोल पंपावर अशा तक्रारीमुळे माहीतगार लोक पेट्रोल टाकण्याचे टाळतात. अशा पेट्रोलपंपावर नवनवीन शक्कल लढवून पैसे कमविले जात आहेत. एटीएम बंद असल्याने नागरिकांना येथे कार्ड स्वाइप करून दोन हजार देण्याचा प्रताप अशा पेट्रोल पंपावर केला जात आहे. मात्र, दोन हजार रुपये स्वाइप करून त्यातून १५० रुपये कमिशन घेतले जात आहे.
भेकराईनगर येथील एका पेट्रोलपंपावर नागरिक बँकेतून पैसे काढून घेतात; परंतु येथे एटीएम
सेंटर नाही.
येथील पेट्रोल भरण्यापूर्वी स्वाइप करण्यात येणाऱ्या मशिनवर नागरिक आपले कार्ड स्वाइप करतात. दोन हजार रुपये स्वाइप केले की, कार्डधारकाला १८५० रुपये दिले जातात. असे उद्योग कामगार करीत आहेत.
याबाबत मालकांनी अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला हवी. तर पेट्रोल भरुन मिळणारी रक्कम मालकाच्या थेट खात्यात जमा होत आहे. एटीएमला पैसे नसल्याने बँकेत रांगा लावावी लागत असल्याने नाइलाजाने असा व्यवहार सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे.
(वार्ताहर)

Web Title: Dissatisfaction of the citizens