उपसरपंच प्रमोद जगताप यांच्या समर्थकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:30+5:302021-08-28T04:14:30+5:30

प्रमोद जगताप यांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. गावाला पाणी फाउंडेशनमध्ये प्रथम पारितोषिक, शरद कृषीग्राम ...

Dissatisfaction among the supporters of Deputy Panch Pramod Jagtap | उपसरपंच प्रमोद जगताप यांच्या समर्थकांमध्ये नाराजी

उपसरपंच प्रमोद जगताप यांच्या समर्थकांमध्ये नाराजी

प्रमोद जगताप यांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. गावाला पाणी फाउंडेशनमध्ये प्रथम पारितोषिक, शरद कृषीग्राम पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार हे तीनही पुरस्कर जगताप यांच्या प्रयत्नामुळे गावाला प्राप्त झाले आहेत. या माध्यमातून दुष्काळी गाव ही ओळख पुसून राज्यपातळीवर गावाचा नावलैकिक झाला होता. गावातील ज्येष्ठ नेते दिलीपराव जगताप यांनी सलग दहा वर्षे ग्रामपंचायत बिनविरोध केली होती. मात्र वैयक्तिक स्वार्थापोटी काही सदस्यांनी हा अविश्वास ठराव दाखल केला आहे. काम करणाऱ्या माणसाला राजकारणापासून व समाजकारणापासून अलिप्त केली जाते, अशी भावना ऋषिकेश ऊर्फ लाला भापकर ,नागेश भापकर, स्वराज भगत, विकास जायपत्रे, अमोल जगताप, मारुती घाडगे, अंकुश जगताप, पाटीलभाऊ भापकर या ग्रामस्थांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी येणाऱ्या काळात न्याय करतील अशीदेखील मागणी या युवक व ज्येष्ठांनी व्यक्त केली.

Web Title: Dissatisfaction among the supporters of Deputy Panch Pramod Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.