शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनात समाजकंटकांकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 01:17 IST

चांदणी चौकात आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर समाजकंटकांनी झाडाच्या फांद्या, दगड रस्त्यावर टाकून तो अडविण्याचा प्रयत्न केला़

पुणे : चांदणी चौकात आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर समाजकंटकांनी झाडाच्या फांद्या, दगड रस्त्यावर टाकून तो अडविण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांवर त्यांनी दगडफेक केली असून, त्यात ५ ते ६ पोलीस जखमी झाले़ या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे़ शहरात तीन ते चार घटना वगळता बंद शांततेत पार पडल्याचे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले़आज सकाळी ६ वाजताच शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला, तेव्हा शाळा-महाविद्यालये बंद असल्याने बससाठी प्रवासी नव्हते़ शहरात नागरिकांनी स्वत:हून दुकाने, आॅफिसेस बंद ठेवल्याने प्रवासी नसल्याने बस सोडण्यात आल्या नाहीत़ शहरात सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला होता़शहरातील विविध भागातून आंदोलक डेक्कन जिमखाना येथील संभाजीमहाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी येत होते़ अनेकांनी त्यासाठी पोलिसांकडे रितसर परवानगी मागितली होती़ शहरात मार्केट यार्ड येथे एका बसची हवा सोडण्यात आली तर लक्ष्मी रोडवर एका बसची काच फोडण्यात आली़ काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले़ ते वगळता शहरात बंद शांततेत पार पडल्याचे त्यांनी सांगितले़>ओळख लपविण्यासाठी तोंडाला बांधले रुमालसकल मराठा समाजाकडून पोलिसांना अगोदर निवेदन देऊन त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले़ ठरल्याप्रमाणे मुख्य संयोजकांनी दुपारी एक वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाषण करून आंदोलन संपल्याचे जाहीर केले होते़ या वेळी तेथे साधारण ८ ते ९ हजार जण जमले होते़ त्यानंतर जमलेले कार्यकर्त्यांपैकी काहींनी सुरक्षा केबीनच्या काचा व लाइट फोडले़ जमलेला जमाव कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता़ पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती अतिशय संयमाने हाताळली़ हा प्रकार करणाºयांचा आंदोलकांशी काहीही संबंध नाही, असे सांगून बोडखे म्हणाले की, या समाजकंटकांपैकी काही जणांनी ओळख लपविण्यासाठी तोंडाला रुमाल बांधले होते़ त्यांना कोणी नेता नव्हता़ त्यांच्याकडे झेंडे नव्हते़ या समाजकंटकांचे सीसीटीव्ही फुटेज, फोटो मिळाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे़

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण