शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पुणे महापालिका बरखास्त करा; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची थेट उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 16:42 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले विनंती अर्जाचे पत्र

ठळक मुद्देसत्ताधारी म्हणून भाजपा पुणेकरांना न्याय देण्यास असमर्थ

पुणे : पुणे शहरात कोरोना आजार थैमान घालत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असूनही सत्ताधारी म्हणून भाजपाचे पदाधिकारी कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिका बरखास्त करावी,अशी मागणी नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करत आहेत. त्यांनी उपाययोजना न करता केवळ हलगर्जीपणा करून शहरातील नागरिकांचा जीव वेठीस धरला आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती, लहान मुले यांना जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागते. सत्ताधारी म्हणून पुणेकरांना न्याय देण्यासही भाजपा असमर्थ ठरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत राज्य शासनाला महापालिका विसर्जित करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार महापालिकेवर लादण्यात आलेल्या कर्तव्याचे पालन केले नाही. किंवा महापालिका उपाययोजना करण्यात सक्षम नसून दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करत असेल. तर राज्य शासन महापालिका बरखास्त करू शकते. असे पत्रात नमूद केले आहे. 

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. दिवसाला ३ हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारी, खासगी रुग्णालयावरीलही ताण वाढत चालला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. महापालिका शहरातील नागरिकांचा जीव वाचवण्याबरोबरच कोरोना रुग्णांची वाढही थांबवू शकत नाहीये. पुणे शहरातील कोरोना नागरिकांवर महापालिकेने किती खर्च केला. ही माहिती दडपून ठेवली जात आहे. स्वब सेंटरवर ५०० रुग्ण आले तरी १०० रुग्णांची तपासणी केली जात आहे. 

पुणे महापालिकेने कोरोनाच्या धर्तीवर कायमस्वरूपी डॉक्टरची भरती प्रक्रिया राबवली आहे. पण १८ महिन्याचा कालावधी उलटूनही भरती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. पालिकेच्या सीसीसी सेंटरवर डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे ताबडतोब महापालिका बरखास्त करण्याची विनंती त्यांनी केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेDhanoriधानोरीYerwadaयेरवडाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका