शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

भोर शहरातील कचरा प्रश्न गंभीर

By admin | Updated: February 14, 2015 00:07 IST

शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या १५ दिवसांपासून बंद असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

भोर : शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या १५ दिवसांपासून बंद असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे; मात्र त्याकडे भोर नगरपलिका प्रशासन व पदाधिकारी डोळेझाक करीत आहेत. ३१ जानेवारीपासून भोर नगरपलिकेच्या कचरावाहतूक करणाऱ्या घंटागाड्या बंद आहेत. त्यामुळे कचराकुंड्या भरून वाहत आहेत. तेथे जागा नसल्याने शहरात जागोजागी नागरिक कचरा टाकत आहेत. त्याचा उग्र वास सुटला असून त्यातून रोगराई वाढू लागली आहे.दरम्यान, भोर नगरपलिकेकडून एका डंपरने शहरातील कचराकुंड्यांत टाकलेला कचरा उचलण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, रस्त्यावर कचरा पडलेला आहे. भोर शहरातील कचरावाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या टेंडरची मुदत संपल्याने पुन्हा टेंडर मागवून कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र, नगराध्यक्ष सभा घेत नसल्याने या टेंडरला मंजुरी देता येत नसल्यानेच काँग्रेसचे नगरसेवक सांगतात. चार बैठका घेतल्या; मात्र बैठकीत नगरसेवक गोंधळ करून कामकाज चालवू देत नाहीत. दुसऱ्या बाजूला बैठक घेत नसल्याचा आरोप करतात. १६ जानेवारीच्या बैठकीचा अजेंडा सर्वांना दिला आहे. शिवाय, कचऱ्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना मुख्याधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यांनी कार्यवाही केली नाही. शहरातील कचरा उचलण्यासाठी मागवलेल्या टेंडरपैकी एकही ठेकेदार शासनमान्यता प्राप्त नाही. त्यामुळे नव्याने टेंडर मागवून ठेका द्यावा, असेही सांगितले होते. मात्र, नगरसेवक हाच ठेका मंजूर करण्याचा आग्रह धरत आहेत. यात माझी काय चूक आहे, असे नगराध्यक्षा दीपाली शेटे यांनी सांगितले. (वार्ताहर)