शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मर्यादा ओळखून शहर व्यवस्थापन : सुलक्षणा महाजन : पर्यावरणप्रश्नी ‘अ‍ॅलर्ट’चा सिटी डॉयलॉग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 12:43 IST

अ‍ॅलर्टच्या (असोसिएशन फॉर लीडरशिप एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग) वतीने ‘सीटी डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर व उपाययोजनांवर पुण्यात व्यापक चर्चा घडली़.

ठळक मुद्दे‘अ‍ॅलर्ट’च्या वतीने ‘सीटी डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर चर्चावाढत्या प्रदूषणाचा धोका; या पार्श्वभूमीवर आपण जागरूक राहायला हवे : वंदना चव्हाण

पुणे : शहरीकरण अनिवार्य असल्याने शहर व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायला हवे. निसर्गनियम, पर्यावरणीय मर्यादा समजावून घेऊन शहर व्यवस्थापन केले पाहिजे. लोकानुनय करण्यासाठी विनाशकारी निर्णय लोकप्रतिनिधींनी घेता कामा नये, असे मत नगररचनातज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले़ शहरातील वाढते प्रदूषण हा अतिशय गंभीर विषय झालेला आहे. दिल्लीनंतर पुण्याचा देखील नंबर लागू शकतो. या पार्श्वभूमीवर अ‍ॅलर्टच्या (असोसिएशन फॉर लीडरशिप एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग) वतीने ‘सीटी डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर व उपाययोजनांवर व्यापक चर्चा घडली़ अध्यक्षस्थानी  अ‍ॅलर्टच्या संस्थापक खासदार वंदना चव्हाण होत्या़ या चर्चासत्रात सुलक्षणा महाजन यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. नागरीतज्ज्ञ, विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि वक्ते या चर्चासत्रात सहभागी झाले. अनिता बेनिंजर म्हणाल्या, शहरीकरणाची व्याख्या बदलणे आवश्यक आहे व आपल्या शहराबद्दल आपुलकी बाळगूनच नियोजन केले पाहिजे. वनराई, मोकळ्या जागा, नद्या जपल्या पाहिजेत़ सुजित पटवर्धन म्हणाले, की खासगी गाड्यांसाठी फ्लायओव्हर आणि रस्ते बांधले तर वाहने आणखी वाढतात आणि पुन्हा रस्ते, फ्लायओव्हर बांधावे लागतात. म्हणून सार्वजनिक वाहतूक मोफत केली तरी एकूण दृष्टिकोनातून फायद्याची ठरेल़देशभ्रतार म्हणाल्या, शहर व्यवस्थापनाच्या निकषांवरच पुणे पालिका हद्दीत कामे सुरू आहेत. नागरिकांच्या, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार काही बदल होत असले तरी ती लोकशाहीची प्रक्रिया आहे . कचरा जाळणाºयांवर कारवाई केली जाईल, असे सुरेश जगताप यांनी सांगितले. हवेतील धूलिकणांचे प्रमाण धोक्याच्या पातळीपेक्षा वाढत आहे, असे पालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी सांगितले. दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाच्या बातम्यांनी संपूर्ण देश हवालदिल झाला आहे. तसेच आता पुण्यात देखील वाढत्या प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण जागरूक राहायला हवे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व संबंधितांनी योग्य दिशेने आणि पुरेसे प्रयत्न करीत आहेत की नाही, याविषयी माहिती घेण्यासाठी  या महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, असे वंदना चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले . ‘सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन’, ‘परिसर’, ‘सजग नागरिक मंच’, ‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड एॅक्टिव्हिटीज’, ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड एक्टिव्हिटीज’, ‘नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज’, ‘सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्ह’, ‘वनराई’, ‘लायन्स क्लब आॅफ इंटरनॅशनल’ या संस्था सहभागी झाल्या़कार्यक्रमाला विवेक वेलणकर, पालिकेचे विरोधी नेते चेतन तुपे, नगरसेवक नंदा लोणकर, नगरसेवक बाबूराव चांदेरे, नगरसेवक महेंद्र पाठारे, नगरसेवक योगेश ससाणे, रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते़ 

टॅग्स :Puneपुणेenvironmentवातावरणpollutionप्रदूषण