शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती गावातील सरपंचाशी मुख्यमंत्र्यानी साधला संवाद पाणी, चारा टंचाई विषयी चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 17:04 IST

 बारामती तालुक्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. 

ठळक मुद्देचारा डेपोच्या मागणीचा विचार मंत्रालय बैठकीत करू : मुख्यमंत्र्याचे आश्वासन 

बारामतीबारामती तालुक्यातील जिरायती भागातील सरपंचांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ कॉन्फरन्स्द्वारे संवाद साधला. तालुक्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर काऱ्हाटी, साबळेवाडी, , मोरगाव, खराडेवाडी, कटफळ आदी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सध्या गावाला भेडसावणाऱ्या प्रश्न  मांडले. यावेळी साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांनी ‘राष्ट्रीय पेलजल योजना मंजुर झाली आहे. मात्र वनविभाग व रेल्वे प्रशासन जागेला मंजुरी देत नाहीत, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉन्फरन्स् कॉलवर असणारे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना या प्रश्न लक्ष घालून अहवाल द्यावा, अशी सुचना केली. तसेच साबळेवाडीचे सरपंच शिंदे यांनी शिरसाई योजनेतील पाण्याचा कोटा वाढवून मिळावा अशी मागणी  मुख्यमंत्र्यांकडे  केली. तर मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी ‘नाझरेचे पाणी पंधरा दिवसात संपणार आहे. त्यामुळे मोरगाव प्रादेशिक पाणी योजनेला जेजुरी एमआयडीसीचे पाणी जोडून मिळावे, अशी मागणी केली. तसेच खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रय खराडे व काऱ्हाटीचे सरपंच बबन जाधव  यांनी ‘चारा छावणी ऐवजी चारा डेपो टंचाईग्रस्त गावांमध्ये सुरू करावा अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘हा मंत्रालयस्तरावरचा विषय आहे. दोन दिवसात मंत्रालयामध्ये बैठक होईल. त्यावेळी हा विषय चर्चेला घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच काऱ्हाटीचे सरपंच जाधव यांनी ‘१ जुनपर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे अशी  मागणी केली. दरम्यान, यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह जिरायती भागातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. ---------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीsarpanchसरपंच