विद्युतपंपांचे वीजजोड कट केल्याने असंतोष, ३० हजार एकरांवरील ऊसशेती अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:07 AM2017-10-28T01:07:36+5:302017-10-28T01:08:52+5:30

केडगाव : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील थकबाकीपोटी सर्व विद्युतपंपांचे वीजजोड महावितरणने तोडले आहेत.

Discontent due to the power cuts of electricity pumps, 30,000 acres of sugarcane tension | विद्युतपंपांचे वीजजोड कट केल्याने असंतोष, ३० हजार एकरांवरील ऊसशेती अडचणीत

विद्युतपंपांचे वीजजोड कट केल्याने असंतोष, ३० हजार एकरांवरील ऊसशेती अडचणीत

Next

केडगाव : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील थकबाकीपोटी सर्व विद्युतपंपांचे वीजजोड महावितरणने तोडले आहेत. यामध्ये एकूण तीन हजार वीजजोड बंद केल्याने दौंड तालुक्यातील एकूण ३० हजार एकर क्षेत्रातील ऊसपीक जळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शेतक-यांना कसलीही पूर्वसूचना न देता घाईघाईने महावितरणने ही कारवाई सुरू केली असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.
नदीकाठच्या पारगाव व नानगावचे वीजजोड गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आले आहेत. लवकरच राहू, पिंपळगाव, देलवडी, हातवळण, कानगाव, उंडवडी, सोनवडी या गावातील विद्युतपंपांवर कारवाई करण्यात येणार आहे. या गावांतील लाखो रुपयांचे वीजबिल थकल्याने ही कारवाई केल्याचे समजते.
शासनाकडून कर्जमाफीप्रमाणे वीजबिल माफ होईल, या आशेने अनेक शेतक-यांनी आपली वीजबिले भरली नव्हती. दोन दिवसांपूर्वी केडगाव येथील विभागीय कार्यालयात वीजजोड बंद करण्याचा संदेश येताच महावितरणने लगबगीने कारवाई करण्यास सुरुवात केली. यावर्षी १४ आॅक्टोबरपर्यंत मुबलक पाऊस होता. त्यामुळे गेले दोन, तीन महिने अनेक शेतक-यांनी आपले विद्युतपंप बंद ठेवले होते. पाऊस उघडल्यानंतर गेल्या आठवड्यात बहुतांशी विद्युतपंप सुरू करण्यात आले होते. महावितरणने कारवाई
सुरू करताच शेतकºयांची तारांबळ उडाली आहे.
यासंदर्भात पारगावचे शेतकरी सुभाष बोत्रे म्हणाले, की सहा महिन्यांपासून आमच्या विद्युतपंपांना कसलेही बिल महावितरणकडून आले नाही. बिल आले नसल्याने एकूण किती पैसे भरायचे, याची माहिती शेतकºयांना नाही. विशेष म्हणजे हा वीजजोड बंद करताना सर्व शेतकºयांना लेखी सूचना देणे गरजेचे होते. आमचे वीजजोड पूर्ववत सुरू न केल्यास शेतकºयांच्या वतीने आंदोलन केले जाईल.
महावितरणचे केडगाव शाखा अभियंता एम. के. पिसाळ म्हणाले, की आम्हाला वरिष्ठांकडून थकबाकीदारांचे वीजजोड बंद करण्याचे आदेश आले आहेत. त्यानुसार कार्यवाही चालू आहे. ज्या शेतकºयांना वीजबिल मिळाले
नाही, त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, आपले वीजबिल भरून टाकावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात
आले आहे.
>इंदापूरला १,१०० कृषिपंपांची बत्ती गुल
भिगवण : महावितरण तुमचा बळीराजावर भरोसा नाय काय! असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. महावितरणने आता थकबाकीदार शेतकºयांची इंदापूर विभागातील ८०० रोहित्रे व वालचंदनगर विभागातील २९९ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकºयांची एकच तारांबळ उडाली आहे. तीन, चार वर्षे दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना आता कुठे चांगल्या पावसामुळे दिलासा मिळतो ना मिळतो तोच महावितरण शेतीचे पाणी बंद करीत आहे. त्यामुळे तोंडचा घास काढून घेतल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
इंदापूर तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी येथील तलाव तीन-चार वर्षांपासून कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे पिण्यासाठी पाणी पुरविताना नाकीनऊ आले होते. शेतातील पिके जळून गेली होती. तलावात पाणी नसतानासुद्धा वीजबिल मात्र नियमित
येत होते.
यावर्षी शेतातून चार पैैसे मिळतील व थकबाकी कमी होईल, असे वाटत असतानाच वीज बंद करून महावितरणने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे.

Web Title: Discontent due to the power cuts of electricity pumps, 30,000 acres of sugarcane tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे