शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

'एनडीए' चा १३९ वा शिस्तबद्ध दिमाखदार दीक्षांत सोहळा; सारंग, सुखोई ठरले आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 19:55 IST

सुखोई ३० विमानांनी फ्लायपास करत दिली विद्यार्थ्यांना मानवंदना

ठळक मुद्देसारंग या हेलिकॉप्टरने चित्तथरारक हवाई केल्या कवायती सादरसंचलन सोहळ्यात एकुण ५४० छात्र सहभागी

पुणे : तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाया आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३९ वा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा शनिवारी कडाक्याच्या थंडीत खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनिचा १३९ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा कोरोनामुळे यंदा हा सोहळा मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. केंद्राच्या तसेच राज्याच्या कोविड नियमावलीमुळे यंदा पालकच्या अनुपस्थितीत हा सोहळा पार पडला.

भारतीय हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल राकेश सिंग भदौरिया या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे होते. त्यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. या वेळी एनडीएचे कमांडंट लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री आदी उपस्थितीत होते.

संचलन सोहळ्यात एकुण ५४० छात्र सहभागी झाले होते. यातील ३०२ छात्र हे १३९ तुकडीचे होते. यातील २२२ छात्र हे लष्कराचे, ४२ छात्र नौदलाचे आणि ३५छात्र हे हवाईदलातील होते. याशिवाय १७ मित्रदेशांच्या छात्रेही सोहळ्यात सहभागी झाले होते. सुखोई ३० विमानांनी फ्लायपास करत यावेळी विद्यार्थ्यांना मानवंदना दिली. तर सारंग या हेलिकॉप्टरने चित्तथरारक हवाई कवायती सादर केल्या.

......बटालियन कॅडेट कॅप्टन अनिरुद्ध सिंगने गुणवत्तेच्या एकूण क्रमवारीत प्रथम येत राष्ट्रपतींचे सुवर्णपदक जिंकले. विभागीय कॅडेट कॅप्टन सोमय बडोलाने गुणवत्तेच्या एकूण क्रमवारीत दुसरे स्थान मिळवत राष्ट्रपतींचे रौप्य पदक पटकावले. तर बटालियन कॅडेट कॅप्टन अनमोलने एकूण क्रमवारीत गुणवत्तेच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर येत राष्ट्रपतींचे कांस्यपदक जिंकले. संचलनादरम्यान सादर केलेला चॅम्पियन स्क्वॉड्रन म्हणून ‘इंडिया’ स्क्वॉड्रनने प्रतिष्ठित ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ मिळविला.  

टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणे