‘एक्स्प्रेस-वे’वर शिस्त लावा

By admin | Published: May 27, 2016 04:55 AM2016-05-27T04:55:10+5:302016-05-27T04:55:10+5:30

दु्रतगती महामार्गावर अवजड वाहने सर्व लेनमधून जात असतात़ त्यामुळे अन्य वाहनांना जागा राहत नाही़ धोकादायक पद्धतीने अवजड वाहने वाहनचालक चालवतात़ त्यांना शिस्त लावून

Discipline 'Express-Way' | ‘एक्स्प्रेस-वे’वर शिस्त लावा

‘एक्स्प्रेस-वे’वर शिस्त लावा

Next

पुणे : दु्रतगती महामार्गावर अवजड वाहने सर्व लेनमधून जात असतात़ त्यामुळे अन्य वाहनांना जागा राहत नाही़ धोकादायक पद्धतीने अवजड वाहने वाहनचालक चालवतात़ त्यांना शिस्त लावून या मार्गावरील अपघातांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली़ त्यांच्यासमवेत पालकमंत्री गिरीश बापट हेही होते़ फडणवीस यांनी याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत.
पुणे-मुंबई मार्गावर डी़ एस़ कुलकर्णी यांच्या मोटारीला बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला़ अपघातानंतर दोन तासांनी कंटेनरचालकाला पोलिसांनी
पकडले़ दु्रतगती मार्गावर वेगाने
वाहने जात असतात़ वाहनांच्या सुरक्षेसाठी दुभाजक तकलादू दिसतात़ अवजड वाहनांना शिस्त नसल्यानेच असे अपघात होत असून, त्यावर तोडगा काढावा व कडक निर्बंध घालावेत, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले़

Web Title: Discipline 'Express-Way'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.