Pune Crime: घरफोड्या करून गायब झाला; १६ महिन्यांनी जाळ्यात आला

By नितीश गोवंडे | Published: January 12, 2024 04:05 PM2024-01-12T16:05:35+5:302024-01-12T16:06:05+5:30

दीड वर्षापासून फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक...

Disappeared after burglarizing a house; Came in net after 16 months pune crime | Pune Crime: घरफोड्या करून गायब झाला; १६ महिन्यांनी जाळ्यात आला

Pune Crime: घरफोड्या करून गायब झाला; १६ महिन्यांनी जाळ्यात आला

पुणे : घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनच्या पथकाने अटक केली. या आरोपीवर हडपसर पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून मागील १६ महिन्यांपासून तो फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते मात्र तो सापडत नव्हता. अखेर गुन्हे शाखेने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आदित्य मयूर जाधव (रा. दत्त मंदिरा समोर, कुंजीर वस्ती, मांजरी बु.) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस हवालदार मनोज खरपुडे यांना माहिती मिळाली की, चार गुन्ह्यांत १६ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी आदित्य जाधव हा त्याच्या घरी आला आहे. यावरून पथकाने आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कावाईसाठी आरोपीला हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे २ सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विवेक पाडवी, पोलिस अंमलदार खरपुडे, लोखंडे, सपकाळ, सरतापे, येवले यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Disappeared after burglarizing a house; Came in net after 16 months pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.