शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

दिव्यांग दिन विशेष : अपंगांच्या प्रश्नांना भिडणारी ‘रणरागिणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 16:09 IST

स्वत:ची दु:ख उगाळत बसण्यापेक्षा इतरांचे अश्रू पुसण्यासाठी ‘ती’ने पुढाकार घेतला आहे....

ठळक मुद्देवडिलांच्या आजारपणामुळे घराची सर्व जबाबदारी आई आणि सुप्रिया दोघींनी आपल्या खांद्यावर

नम्रता फडणीस- पुणे : वय अवघे २२ वर्षांचे. आई धुणीभांडी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करते, तर  ‘ती’ सरबताची गाडी चालविते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तरीही स्वत:ची दु:ख उगाळत बसण्यापेक्षा इतरांचे अश्रू पुसण्यासाठी ‘ती’ने पुढाकार घेतला आहे. दिव्यांगांच्या समस्या, त्यांच्या अडचणी सोडवित त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी  ‘ती’ धडपडत आहे. सध्याच्या इंटरनेटच्या युगात मोबाईलमध्ये हरवलेल्या तरुणाईपुढे  आपल्या विधायक  कार्यातून ‘ती’ने आदर्श निर्माण केला आहे. दिव्यांगांच्या प्रश्नांना भिडणाऱ्या या रणरागिणीचे नाव आहे सुप्रिया कापा लोखंडे. वाघोली येथील सरकारी गायरान जागेत ती राहते. वडिलांच्या आजारपणामुळे घराची सर्व जबाबदारी आई आणि सुप्रिया दोघींनी आपल्या खांद्यावर पेलली आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने सुप्रियाला शिक्षण पूर्ण करता आले नाही. जेमतेम चौथीपर्यंतच शिक्षण ती घेऊ शकली.  २०१२ मध्ये  प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात वयाच्या सोळाव्या वर्षी तिने आमदार बच्चू कडू यांचे विचार ऐकले आणि ती प्रभावित झाली. त्या दिवसापासूनच समाजातील दुर्लक्षित वंचित घटकांच्या न्याय्य हक्कासाठी तिने लढण्याचे ठरविले. अगदी दिव्यांगांना व्हीलचेअर मिळवून देणे, त्यांना जिल्हा परिषदेकडून महिना १ हजार रुपये निर्वाह भत्ता मिळवून देणे, अपघातामध्ये दोन पाय गमावलेल्या युवकाला रुग्णालयात तातडीची मदत मिळवून देत दोन महिन्यात जयपूर फूटच्या साहाय्याने स्वत:च्या पायावर उभे करणे, दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रॅलीचे आयोजन आदी विविध कार्यांमध्ये ‘ती’ने पुढाकार घेतला आहे. सुप्रिया म्हणाली, की गेल्या सात वर्षांपासून मी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेमध्ये प्रामाणिकपणे काम करीत आहे. शेतकरी बांधवांच्या गुजरात, मुंबई आंदोलनातही सक्रिय सहभागी झाले होते. पोलिसांचा लाठीमारदेखील खाल्ला आहे. जी गतिमंद मुले आहेत त्यांच्या कुटुंबीयांनादेखील मानधन मिळायला पाहिजे. ...मी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचा रहिवासी आहे. टाकी पाडण्याचे काम करीत असताना दोन्ही पायांवर काही भाग कोसळला. सोलापूर मध्ये कुठलेच डॉक्टर हात लावत  नव्हते. तेव्हा सुप्रियातार्इंना फोन केला. पुण्यात ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले. दोन्ही पाय कापावे लागले. त्यांनीच कृत्रिम पाय मिळवून दिल्याने आज स्वत:च्या पायावर उभा आहे.- रामा वाघमोडे, दिव्यांग................सुप्रियाताईंनी व्हीलचेअर मिळवून देण्यापासून ते निर्वाह भत्ता मिळवून देण्यापर्यंत सर्व मदत केली. त्यांचे उपकार कधीही विसरू शकत नाही. - शबाना सय्यद, दिव्यांग 

टॅग्स :PuneपुणेDivyangदिव्यांगHealthआरोग्य