शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जर पोलिसांनी जबरदस्तीने वेळेआधी दुकाने बंद केली तर थेट तक्रार करा : शेखर गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 21:11 IST

शहरातील काही भागात जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात येत असल्याच्या तक्रारी

ठळक मुद्देप्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने दुपारीच बंद करण्याबाबतचे कुठलेही आदेश दिले गेले नसल्याचे स्पष्टदुकाने सकाळी सात ते सायंकाळी सातवाजेपर्यंत खुली ठेवण्याची दिली परवानगी

नीलेश राऊत -

पुणे : कंटन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) वगळता शहरातील अन्य भागात सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत विविध व्यवसायांची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली गेलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी विनाकारण दुपारीच दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती करू नये़ अशा सूचना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत. तसेच दुकाने बंद करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी जबरदस्ती केल्यास संबंधितांची तक्रार महापालिका आयुक्त कार्यालयात किंवा पोलीस आयुक्तालयात करावी असेही गायकवाड यांनी सांगितले आहे.

पुणे शहरातील ६९ कंटन्मेंट झोन वगळता अन्य भागात पुणे महापालिकेने विविध प्रकारच्या व्यवसायाची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सातवाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी ६ मे पासून दिली आहे. १२ मे रोजी नवीन आदेश जारी करून, यापूर्वी परवानगी दिलेल्या व्यवसायांबरोबर अन्य व्यवसायांनाही व्यवसाय सुरू करण्यास नव्याने परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आजही शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील काही भागांमध्ये पोलिसांकडून दुपारीच दुकाने बंद करण्याबाबत जबरदस्ती केली जात आहेत. व्यावसायिकांनी पालिकेने दिलेल्या परवानगीनुसारच दुकाने सुरू ठेवले असल्याचे सांगितले तरी, काही ठिकाणी पोलीस कर्मचारी स्थानिक पोलीस स्टेशन अथवा वरिष्ठांचा आदेश असल्याचे सांगून दुकाने बंद करण्याबाबत व्यावसायिकांवर दबाव टाकत आहेत.शहरातील विविध भागात हे प्रकार वारंवार घडत असल्याने, काही व्यावसायिकांनी पालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. त्यामुळे याची दखल घेत महापालिका आयुक्त गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांशी बोलून या प्रकाराबाबत माहिती दिली असता, प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने दुपारीच बंद करणयाबाबतचे कुठलेही आदेश दिले गेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असल्याचे गायकवाड यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.शहरातील काही भागात जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात येत असल्याच्या तक्रारी माझ्याकडेही आल्या आहेत. मात्र पोलीसांनी जबरदस्ती करून परवानगी दिलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंतच्या वेळेत दुकाने बंद करण्याबाबत जबरदस्ती करणे योग्य नाही. जर असे प्रकार कुठे घडत असतील तर संबधित व्यावसायिक व दुकानदारांनी थेट माझ्याशी अथवा आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयातही याबाबत तक्रार करावी असेही गायकवाड यांनी सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाbusinessव्यवसायPoliceपोलिसcommissionerआयुक्तCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस