शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Dinanath Mangeshkar Hospital: वार्षिक १ रुपया भाड्यानं जमीन तरी बेफिकीर दीनानाथ रुग्णालय २० लाख मागतंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:03 IST

राज्य सरकारने दीनानाथला जमीन देण्यापेक्षा आहे तीच जमीन त्यांच्याकडून काढून घ्यावी, राजकीय पक्षांची मागणी

पुणे: गर्भवती महिलेचा बळी घेणाऱ्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला राज्य सरकारने जमीन १ रुपया भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे. १८ फेब्रुवारीला झालेल्या मंत्रमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते आहे. सरकारकडून एवढी मदत होत असताना रुग्णांना लुटण्याचे काम हे रुग्णालय करत आहे. रुग्णांच्या जीवाची परवा न करता पैसे उकळण्याचे काम रुग्णालय प्रशासनाकडून होत आहेत. कालच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच सरकारने रुग्णालयाला जमीन भाड्याने दिल्यानंतर अनेक सवालही उपस्थित होऊ लागले आहेत.     

 दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. त्यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौ. एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. या शिवाय ट्रस्टने मौजे कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान हा नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी ७९५ चौ. मीटर जमीनीची आवश्यकता असल्याची मागणी ट्रस्टने केली होती. त्यानुसार ही जमीन वार्षिक १ रुपया या नाममात्र दराने भाडेपट्टयाने देण्यास मंजूरी देण्यात आली. नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित ट्रस्ट करणार आहे. या पुलामुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाईकांचे वाहने व ट्रस्टचे संबंधित वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना ये-जा करणे सूकर होणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. 

पण कालच्या घटनेनंतर रुग्णालयाची बेफिकिरता दिसून आली आहे. त्यांनी ज्या पुलासाठी या जमिनीची मागणी केली होती. त्यामुळे नातेवाईक, रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाईकांचे वाहने यांचे ये - जा सुकर होणार होते. त्यावरही सर्वत्र टीका होऊ लागली आहे. रुग्णालयाला जमीन भाड्याने देण्यापेक्षा त्यांच्याकडून आहे ती जमीन काढून घ्या. अशी मागणी  राजकीय पक्षांनी सरकारकडे केली आहे. प्रशासनाने या घटनेनंतर रुग्णालयाला कोणतीही जमीन देऊ नये. याठिकाणी सरकारी रुग्णालय उभारावे. दीनानाथ मंगेशकर फाउंडेशनच्या ताब्यातून ही जमीन काढून घ्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.    

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMONEYपैसाWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिला