शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

'...त्यांची चौकशी प्रशासकीय आका कशी करणार?', मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अध्यक्ष पवारांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:54 IST

Deenanath Mangeshkar Hospital case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेप्रकरणी सरकारने चौकशी समिती नेमली आहे. पण, समितीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis Deenanath Mangeshkar Hospital Case News: 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालय म्हणजे एक आकाच आहे आणि त्याची चौकशी एक प्रशासकीय आका कशी करू शकणार?', असा सवाल करत राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. बोरकर यांनी राधाकिशन पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखल करू घेण्यास नकार दिला. १० लाख रुपये जमा करण्यास सांगितल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने चौकशी समिती नेमली आहे. 

हेही वाचा >>‘ही’ रुग्णालयाची मोठी चूक..! चौकशी समितीच्या अहवालात ‘दीनानाथ’वर ठपका

आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकिशन पवार हे या चौकशीचे समितीचे अध्यक्ष आहेत. पण, त्यांना समितीतून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष बोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्याबद्दल गंभीर आरोप केले आहेत. 

मनसे नेते बोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काय?

"पुणे शहरात नुकतेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती भगिनीस बाळांतपणा दरम्यान उपचार न मिळाल्याने या भगिनीचा दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे बळी गेलेला आहे. या विषयास दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर राज्य शासनाने चौकशी समिती नेमलेली आहे. या चौकशी समितीचे अध्यक्ष आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकिशन पवार हे आहेत."

"महोदय राधाकिशन पवार या दोषी व्यक्तीने दोषी असलेल्या धर्मादाय दीनानाथ रुग्णालय प्रशासनाची चौकशी करू नये. धर्मादाय दीनानाथ रुग्णालयामध्ये बाळंतपणासाठी आलेल्या तनिषा सुशांत भिसे या भगिनीचा रुग्णालयाने सांगितलेली आगाऊ पैसे न भरल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने दुर्दैवी बळी घेतला आहे."

दोषीच दोषीची चौकशी काय करणार?

"परंतु समितीमध्ये असलेल्या राधाकिसन पवार यांच्यावर अनेक वेळा त्यांच्या शासकीय कामात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याबाबत त्याच्यावर विधानसभेत आरोप ठेवण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर असलेल्या आरोपांबाबत विधानसभेतही लक्षवेधी घेऊन फक्त चर्चाच झालेली आहे. राधाकिशन पवार हे दोषी असूनही त्यांच्यावर बडतफीची कारवाई अपेक्षित असताना, अशी दोषी व्यक्ती दोषी धर्मादाय दीनानाथ रुग्णालयाची काय चौकशी करणार?"

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय म्हणजे एक आका

"या चौकशीतून सत्य बाहेर पडेल यात शंका वाटते. अशा प्रकारची चौकशी म्हणचे गुन्हेगाराची चौकशी गुन्हेगाराने करायची असे होते. हे आम्ही सहन करणार नाही. धर्मादाय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल म्हणजे एक आकाच आणि त्यांची चौकशी एक प्रशासकीय आका म्हणजे राधाकिशन पवार हे कसे करू शकणार?"

"शासनाला पीडित भिसे परिवाराला खरंच न्याय द्यायचाच असेल, तर राधाकिशन पवार यांना चौकशी समितीमधून ताबडतोब काढून टाकावे अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला आम्ही जबाबदार राहणार नाही. हे आम्ही शासनास सांगू इच्छितो", असे या पत्रात म्हटले आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर जागरूक पुणेकर समितीचे दिलीप सिंग विश्वकर्मा, रुग्ण सेवा फाऊंडेशनचे  प्रवीण ठोंबरे यांच्यासह इतरांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटलPune Crimeपुणे क्राईम बातम्याMNSमनसेPoliceपोलिस