शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक आहे म्हणून मनाला वाटेल ते करणार का?- दिलीप मोहिते-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 09:33 IST

आम्ही हे खपवून घेणार नसल्याचेही आमदार मोहिते यांनी उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले...

राजगुरुनगर (पुणे) : पुणे-नाशिक महामार्गावर काही कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यावरून आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी टी अँड टी म्हणजे तांदळे आणि थोरात कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महत्त्वाचे म्हणजे थोरात हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक झाला म्हणजे मनाला वाटेल ते करणार का? आम्ही हे खपवून घेणार नसल्याचेही आमदार मोहिते यांनी उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर बाह्यवळण काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही दिवसांत टोल आकारणी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, वरची भांबूरवाडी, तुकाईवाडी परिसरात सेवा रस्त्याची कामे ठेकेदाराने अपूर्ण ठेवली आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. घर एका बाजूला तर शेती विरुद्ध बाजूला किंवा अर्धे क्षेत्र अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. पूर्वी वापरात असलेला रस्ते बाह्यवळणात गेले आहेत. त्यामुळे वाळुंज वस्तीतील दीडशे घरांकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. महिला व शालेय विद्यार्थ्यांना येणे-जाणे धोकादायक बनले आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा पाठपुरावा केला, निवेदने दिली. मात्र, अधिकारी ठेकेदारांनी कानाडोळा केला.

दोन महिन्यांपूर्वी तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी ग्रामस्थांच्या आग्रहाखातर ठेकेदार टी अँड टी कंपनीच्या प्रमुखांसह महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांची एकत्रित बैठक झाली. आश्वासने देण्यात आली, कारवाई काही झाली नाही. म्हणून सोमवारी (दि. १०) आमदार मोहिते-पाटील, भांबूरवाडीचे सरपंच विजय थिगळे, सुभाष गाढवे, प्रवीण कोरडे, किशोर रोडे, माजी सरपंच सुर्वे पाटील यांच्यासह दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी थेट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

यावेळी आमदार मोहिते-पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असलेल्या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी पोलिसांनी बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक राजगुरुनगर शहरातील जुन्या रस्त्यावर वळवली. तरीही महामार्गावर ट्रॅफिक जॅम झाले होते. सेवा रस्त्याची कामे पूर्ण झाल्याशिवाय टोल नाका सुरू करणार नाही, असे महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांनी मोबाइलवर सांगितले. त्यानंतर मोहिते-पाटील व ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNashikनाशिकPuneपुणेKhedखेड