शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

दुर्मिळ साहित्याचे होणार डिजिटायझेशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:03 PM

राज्य मराठी विकास संस्थेतर्फे पुण्यातील चार संस्थांना यंदाच्या वर्षीपासून पाच लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

ठळक मुद्देया संस्थांकडून जुनी पुस्तके, कागदपत्रे तसेच नियतकालिकांच्या डिजिटायझेशनवर भर देण्यात येणार

पुणे : मराठी भाषेचा समृध्द वारसा जतन करता यावा, प्रयोगशील उपक्रमांच्या माध्यमातू भाषा संशोधन व्हावे, या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेतर्फे पुण्यातील मराठी अभ्यास परिषद, महाराष्ट्र ग्रंथोत्तोजक संस्था, श्री शिवाजी रायगड स्मारक, भारत इतिहास संशोधक मंडळ या चार संस्थांना यंदाच्या वर्षीपासून पाच लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या माध्यमातून दुर्मिळ नियतकालिके, पुस्तके तसेच कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याचा मानस या संस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे.मराठी भाषेच्या विकासाकरिता या भाषेविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. काळानुरूप होणाऱ्या  बदलांचा आढावा घेतला की, त्याची भाषेच्या प्रगतीसाठी मदत होते. त्यामुळे राज्य मराठी विकास संस्थेनेही याकरिता विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, यंदाच्या वर्षीपासून मराठी भाषाविषयक संशोधन आणि संवर्धन करणाऱ्या संस्थांना अनुदान देण्यात येणार आहे.या अनुदानासाठी राज्य मराठी विकास संस्थेकडे एकूण ५५ प्रस्ताव आले होते. त्यापैकी १४ संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत. यामध्ये पुण्यातील चार संस्थांचा समावेश आहे. या अनुदानांतर्गत प्रत्येकी संस्थांना पाच लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल, अशी तरतूद आहे. या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मंजुरीची पत्रे पाठवण्यात येतील. त्याची प्रक्रिया सुरू असून, हे अनुदान २०१७-२०१८ या वर्षासाठी मंजूर करण्यात आले आहे. भाषाविषयक काम करणा-या संस्थांचे योगदान, त्यांच्यातर्फे हाती घेण्यात येणारे प्रकल्प, या प्रकल्पांमधून मराठी भाषेच्या संशोधनाला चालना मिळू शकेल का, अशा विविध निकषांवर प्रस्तावांचा विचार करण्यात आला.महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गेली १२३ वर्षे उत्कृष्ट मराठी ग्रंथांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेतर्फे दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मराठी भाषा, भाषाव्यवहार, व्याकरण आदींच्या अभ्यासासाठी मराठी अभ्यास परिषद १९८३ पासून काम करत आहे. ‘भाषा आणि जीवन’ या नियतकालिकाच्या डिजिटायझेशनसाठी परिषद प्रयत्नशील आहे. शासनाकडून मिळणा-या अनुदानातून डिजिटायझेशनला सुरुवात करण्यात येणार आहे. या अंकांचा बांधीव खंड तयार करुन महाराष्ट्रातील प्राचीन ग्रंथालयांना भेट देण्यात येणार आहे. भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच शिवाजी रायगड स्मारक समितीतर्फे मोडी लिपीतील कागदपत्रांचे, पुस्तकांचे मराठीकरण करण्यात येणार आहे. शिवाजी रायगड स्मारक समितीकडून शासनाकडून मोडी लिपीतील सुमारे ३ लाख कागदपत्रे खरेदी करण्यात आली आहे. या कागदपत्रांचा देवनागरी लिपीत अनुवाद करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. ...............पाच लाखांचे अनुदान : पुण्यातील चार संस्थांचा समावेशराज्य मराठी विकास संस्थेतर्फे अनुदानासाठी भाषाविषयक काम करणा-या संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले होते. संस्थेकडे आलेल्या ५५ प्रस्तावांची छाननी करुन १४ संस्थांना अनुदान मंजूर करण्यात आले. यामध्ये पुण्यातील चार संस्थांचा समावेश आहे. या संस्थांकडून जुनी पुस्तके, कागदपत्रे तसेच नियतकालिकांच्या डिजिटायझेशनवर भर देण्यात येणार आहे.- आनंद काटीकर, प्रभारी संचालक, राज्य मराठी विकास संस्था

टॅग्स :Puneपुणेdigitalडिजिटलliteratureसाहित्य