शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवघड जागेचं दुखणं.! बसथांब्यांच्या नुकसानीने पीएमपीएल हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 14:39 IST

पीएमपीएलचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड व परिसर असे मिळून सुमारे ४ हजार बसथांबे आहेत.

ठळक मुद्देदुहेरी अडचण: प्रायोजक मिळेना व सांभाळताही येईनातगर्दीच्या रस्त्यांवरचे बसथांबेही मोडकळीस आलेलेबस थांब्यांचे व्यवस्थापन स्थापत्य, जाहिरात, वाहतूक अशा विभागांकडून

पुणे : पीएमपीएल या सार्वजनिक प्रवासी सेवेच्या बसथांब्यांच्या वाढत्या नुकसानीने प्रशासन हैराण झाले आहे. रात्रीच्या वेळेस मुक्काम म्हणून या थांब्यांचा वापर करणाऱ्यांकडून तिथे मोठ्या प्रमाणावर तोडफोड तसेच चोऱ्याही होत आहेत. आधीच प्रायोजक मिळेनात व थांबेही सांभाळता येईनात अशा दुहेरी अडचणीत प्रशासन सापडले आहे.पीएमपीएलचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड व परिसर असे मिळून सुमारे ४ हजार बसथांबे आहेत. त्यातील साधारण दीड हजार बस शेड आहेत, तर अन्य थांबे म्हणजे एका खांबावर पिवळी पाटी लावून बस थांबण्यासाठी केलेली जागा आहे. महापालिकेच्या जागेत या शेड बांधण्यात येतात. तिथे प्रवाशांची बसण्याची व्यवस्था व शेड म्हणजे उन किंवा पावसापासून बचाव असे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र तशी स्थिती नाही. गर्दीच्या रस्त्यांवरचे बसथांबेही मोडकळीस आलेले आहेत. बाकडे तुटलेले, बसता येत नाही, शेडवरचे छत उडालेले अशी अनेक थांब्यांची अवस्था आहे. पीएमपीएल मध्ये थांब्यांचे व्यवस्थापन स्थापत्य, जाहिरात, वाहतूक अशा विभागांकडून पाहिले जाते. गर्दीच्या रस्त्यांवर असलेल्या थांब्यांकरता जाहिरातदारांकडून जाहिरात लावली जाते, थांब्यांची दुरूस्ती मात्र टाळली जाते.  जाहिरातीचे उत्पन्न थांब्यांच्या दुरूस्तीकरता वळवणे शक्य असूनही व्यवस्थापनाकडून तसे केले जात नाही.काही मार्गावरील गाड्या रात्री बारापर्यत व काही गाड्या रात्रभर सुरू असतात.  त्या मार्गांवरील थांब्यांवर दिव्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना अंधारात थांबावे लागते. वेळापत्रक वगैरे नाही पण बसण्यासाठी व्यवस्थित बाकडे व दिवे असावेत असे त्यांचे म्हणणे आहे............उत्पन्नाकडेच लक्षपीएमपीएल प्रवाशांच्या सेवेसाठी आहे यावर कंपनीच्या अध्यक्षांपासून ते शिपायापर्यंत कोणाचाच विश्वास नाही. जाहाराती, लोकप्रतिनिधींचा विकासनिधी यातून थांबे तयार केले जातात, मात्र त्यात कसलीही कल्पकता तसेच प्रवाशांच्या उपयुक्ततेचा विचार केलेला नसतो. जाहिरात कशी करता येईल याला मात्र प्राधान्य दिलेले असते. थांबे उपयुक्त तर हवेतच तसेच आकर्षकही हवेत.-जुगल राठी, पीएमपीपीएल प्रवासी मंच 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल