शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का?; अजित पवारांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 12:51 IST

राज्यातील या ऐतिहासिक राजकीय घडमोडींबाबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. 

पुणे-

शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडून राज्यानं ऐतिहासिक सत्तांतर पाहिलं. नवं सरकार सत्तेत येऊन आता काही महिनेही उलटले आहेत. पण असं असतानाही सत्ताधारी पक्षाला इतक्या मोठ्या बंडाची जराशीही कल्पना नव्हती यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाही. राज्यातील या ऐतिहासिक राजकीय घडमोडींबाबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. 

आमदार फुटणार आहेत हे आधीच कळलं होतं. तसं उद्धव ठाकरेंना आम्ही कळवलं देखील होतं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. त्यात अजित पवार बोलत होते. एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का? या प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार यांनी पडद्यामागची सर्व कहाणी सांगितली. 

"दोन-तीन वेळेला तशी माहितीही मिळाली होती. पवार साहेबांनीही उद्धवजींना माहिती दिली. मीही त्यांना माहिती दिली होती. शरद पवारांनी तर बैठक देखील घेतली होती. पण उद्धव ठाकरे म्हणायचे की मला माझ्या आमदारांवर विश्वास आहे. ते इतकी टोकाची भूमिका घेणार नाहीत असं त्यांना वाटायचं. पण जो पहिला ग्रूप १५-१६ आमदारांचा गेला. त्यानंतर आमदारांना एकजुटीनं सोबत ठेवण्याची गरज होती. तशाप्रकारची गरज त्यावेळी दाखवली गेली नाही. मग मुभा असल्यासारखं तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, ज्यांना थांबायचं आहे त्यांनी इथं थांबा असं वातावरण त्यावेळी पाहायला मिळालं. आता वस्तुस्थिती काय हे त्यापक्षाचेच नेते सांगू शकतील", असं अजित पवार म्हणाले. 

"नेतृत्त्वानं आपल्या सहकाऱ्यांवर डोळे झाकून जो विश्वास टाकला. त्या विश्वासाला पूर्णपणे तडा देण्याचं काम यानिमित्तानं करण्यात आलं. काहीजण गाफील राहिले असं म्हणायला हरकत नाही", असंही अजित पवार म्हणाले. 

सहा महिनेआधीच कुजबूज कानावर होतीशिंदे गटानं बंडाचं निशाण फडकावलं त्याच्या सहा महिने आधीच माझ्या कानावर याची कुजबूज आली होती, असंही अजित पवार यांनी सांगितलं. "एकदम सुरुवातीला फार सहा महिने आधी. म्हणजे जूनच्या आधीच कुजबूज माझ्या कानावर आली होती. माझी आणि उद्धव ठाकरेंची दररोज कामानिमित्त बैठक व्हायची. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं आणि त्यांनी माझ्याही कानावर आलं आहे, मी त्यांना बोलावून त्यांच्याशी बोलून घेतो असं म्हटलं होतं. आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे त्यावर मार्ग काढतो असंही ते म्हणाले होते", असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे