शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे वाटले नव्हते, पण पदाचा मान ठेवतो; नारायण राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 12:38 PM

नारायण मनाची श्रीमंत ठेवावी, म्यानात एकच तलवार राहू शकते, असे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते.

ठळक मुद्देराणे यांनी बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा मान सन्मान ठेवावाराणे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तुतीसुमने उधळली.

पुणे : शिवसेनेमध्ये मी 39 वर्षे होतो. याकाळात बाळासाहेबांच्या जवळ आलो. साहेब म्हणायचे की, नारायण मनाची श्रीमंत ठेवावी, म्यानात एकच तलवार राहू शकते. माझे गुरु बाळासाहेब ठाकरेच आहेत, असे उद्गार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढले. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. 

पुण्यातील सॅटर्डे क्लबमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार गिरीश बापट, मोहन जोशी, घटनातज्ज्ञ उल्हास बापट, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह अनेक अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राणे यांनी बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. एका म्यानात दोन तलवारी कोणत्या याबाबत सांगताना राणे म्हणाले की, पैसा आणि नावलौकिक असे बाळासाहेबांनी सांगितले होते. 

यानंतर राणे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तुतीसुमने उधळली. फडणवीस यांना मी पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी पाहिले. ते अभ्यासू व्यक्ती, सहनशील व्यक्ती, कोणावर रागवले नाहीत. कधी उत्तर दिले नाही, असं नाही पण त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा घालून दिलेला आदर्श त्याला साजेस काम केले आणि पत सावरली. आता उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा मान सन्मान ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.  

 यानंतर त्यांनी ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. व्यक्ती म्हणून मला कधीही वाटले नव्हते की उद्धव मुख्यमंत्री होतील. मात्र, पदाचा मान ठेवावा लागतो. उद्धव अनुभव शून्य व्यक्ती असल्याने राज्य अधोगतीकडे जाईल, असा इशाराच त्यांनी दिला. तसेच यानंतर त्यांनी नाईट लाईफवर भाष्य केले. नाईच लाईफची मागणी कोणाचीच नसताना तो केवळ चिरंजीवाचा हट्ट आहे. हा बालहट्ट पुरविण्याऐवजी इतर प्रश्न सोडविण्यात लक्ष घालावे, असा सल्ला राणे यांनी दिला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेNightlifeनाईटलाईफDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस