१ मार्चपूर्वी कोव्हिशिल्ड घेतली का? ...तरच मिळणार आत्ता डोस लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:34+5:302021-05-15T04:10:34+5:30

निलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोव्हिशिल्ड लसचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना प्रारंभी २८ दिवसांनी तर नंतर ४५ ...

Did you take Covishield before March 1? ... only then will you get the dose of vaccine now | १ मार्चपूर्वी कोव्हिशिल्ड घेतली का? ...तरच मिळणार आत्ता डोस लस

१ मार्चपूर्वी कोव्हिशिल्ड घेतली का? ...तरच मिळणार आत्ता डोस लस

निलेश राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोव्हिशिल्ड लसचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना प्रारंभी २८ दिवसांनी तर नंतर ४५ दिवसांनी दुसरा डोस घेतला तर तो अधिक योग्य राहील असे सांगण्यात आले. त्यानुसार केंद्र सरकारच्या कोविन पोर्टलवर ‘प्रोग्रॅम सेट’ करण्यात आला. पण आता कोव्हिशिल्ड चा दुसरा डोस हा १२ ते १६ आठवड्यानंतर घेतल्यावर तो अधिक प्रभावी ठरेल असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आता १ मार्च पूर्वी कोव्हिशिल्ड चा ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनाच दुसरा डोस मिळणार आहे.

कोव्हिशिल्ड चा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आधीच दुसऱ्या डोससाठी तारखांवर तारखा मिळत असताना आता नवीन नियमावलीमुळे पुन्हा दुसऱ्या डोससाठी वाट पाहावी लागणार आहे. त्यात महापालिकेकडे कोव्हिशिल्ड चा आता एकही डोस शिल्लक नसल्याने व येत्या दोन दिवसात सलग सुट्टया आल्याने कोव्हिशिल्ड लसीचा शासनाकडून पुरवठा होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे ज्यांनी १ मार्च पूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांनाही पुन्हा वाटच पाहावीच लागण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने लसीचा पहिला डोस सध्या तरी कोणालाच देऊ नये म्हणून जाहीर केले आहे. आता कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोससाठी आणखी किती वेळ नागरिकांना वाट पहावी लागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

--------------------

लसीकरण केंद्रांवर काय सांगायचे?

लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड चा दुसरा डोस ४५ दिवसांनी मिळेल म्हणून नागरिकांना परत पाठविण्यात येत होते. त्यातच आता केंद्राकडून दुसऱ्या डोसबाबतचा नवीन कालावधी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोविन पोर्टलवर पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची दुसरा डोस घेताना नोंद करताना विहित ९४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला नसेल तर त्यांची नोंदच होणार नाही. परिणामी त्यांना दुसरा डोस देता येणार नसल्याने आलेल्या नागरिकांना काय उत्तरे द्यायचे, सरकारच्या या निर्णयाचे स्पष्टीकरण कसे करायचे, असा प्रश्न आता सर्वच केंद्रांवर उपस्थित होणार आहे. महापालिकेचे कर्मचारी कोविन पोर्टलवर सिस्टिमनुसारच नोंद घेऊ शकणार आहेत.

----------------------

पहिलाच डोस द्यायचा तर जाहीर करा

इतर देशांप्रमाणे आपल्याकडेही जर सर्व नागरिकांना पहिलाच डोस प्राधान्याने द्यायचा असेल तर, वारंवार दुसऱ्या डोससाठीचा कालावधी कशासाठी वाढवायचा? सरळ पहिला डोसच दिले जाणार असल्याचे जाहीर का केले जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

----------------------------

कोव्हॅक्सिनचे शहरात दिलेले डोस

पहिला डोस दुसरा डोस

हेल्थ वर्कर ३,७२५ २,५१३

फ्रंट लाईन वर्कर३,७८८ १,९८३

६० वर्षांवरील ३८,६६२२८,००८

४५ ते ५९ वय ११,१५४१०,८२५

१८ ते ४४ वय ९,५१४ ०,०००

--------------------

शहरात १४ मार्चपर्यंत एकूण ६६ हजार ८४३ कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. अद्यापही २३ हजार ५१४ जणांना दुसरा डोस देणे बाकी आहे. कोव्हिशिल्डचे एकूण ६ लाख ३३ हजार ४० जणांना पहिला डोस दिला गेला असून यापैकी ४ लाख ५४ हजार ५७८ जणांना दुसरा डोस देणे बाकी आहे.

-----------------------------------

Web Title: Did you take Covishield before March 1? ... only then will you get the dose of vaccine now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.