शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या कुटुंबाचे चुकलं का? पिंपरीत 'फ्लेक्सबाजी'तून भाजप नगरसेवकाचं बंडाचं निशाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 15:25 IST

पिंपरीत भाजपला गटबाजीचा धोका : पक्षश्रेष्ठी व स्थानिक नेत्यांवर उघड नाराजी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात माझे वडील बाबासाहेब लांडगे व माझे चुलते अंकुशराव लांडगे यांनी भाजपाचा पाया रोवून पक्षाचा विस्तार केला. आमचे कुटुंब ४० वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ राहिले. तरीही महापालिकेतील महत्त्वाच्या पदासाठी निष्ठावंताचा विचार केला गेला नाही. त्यामुळे माझे व आमच्या कुटुंबाचे चुकलं का ? असा भावनिक सवाल करीत भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी बंडाचे निशाण उभारले आहे.

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शहरातून बिनविरोध निवडून आलेले एकमेव नगरसेवक म्हणून रवी लांडगे यांचे नाव घेतले जाते. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत त्यांना एकही महत्त्वाचे पद मिळाले नव्हते. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निष्ठावंत गटातून त्यांना दावेदार समजले जात होते. मात्र, एक महिन्यांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे निमित्त करून त्यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नाराज झालेल्या लांडगे यांचे नाव उपमहापौरपदासाठी पुढे करण्यात आले. मात्र, त्याविषयी त्यांनी अनुकूलता दर्शविली नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आमच्या कुटुंबाने ४० वर्षे भाजपशी एकनिष्ठता जपली, सोयीचे नाही तर स्वाभिमानाने राजकारण केले, आमचं चुकलं का ? गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध केला, मीही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, हे माझे चुकलं का ? असे स्थानिकांच्या भावनेला हात घालणारी फ्लेक्सबाजी भोसरी विधानसभा मतदारसंघात रवी लांडगे यांच्या समर्थकांनी केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना उघडपणे या फ्लेक्सबाजीतून आव्हान दिल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.---------------

म्हणून नितीन लांडगेंना संधी...महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून भोसरीचे आमदार महेश लांडगे व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हातात महत्त्वाच्या पद वाटपाचे सूत्रे पक्षश्रेष्ठींनी दिली आहेत. महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपद म्हणजे भविष्यात आमदारकीचे दावेदार समजले जाते. त्यापार्श्वभूमीवर यंदा स्थायी समिती अध्यक्षपदावर भोसरीतून रवी लांडगे व चिंचवडमधून शत्रुघ्न काटे यांनी दावा केला होती. परंतु, दोन्ही नेत्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात भविष्यात वरचढ ठरेल, अशा नगरसेवकाला संधी देण्याचा धोका पत्करला नाही. म्हणून स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ नितीन लांडगे यांच्या गळ्यात पडल्याची भाजपच्या गोटात चर्चा आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण