पुण्यात डिकी चोराचा धुमाकूळ; 6 रिक्षांच्या डिकी उचकटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 10:12 IST2019-12-18T10:12:02+5:302019-12-18T10:12:13+5:30
पुणे: रिक्षाच्या डिकी उचकून आतील रोख रक्कम चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. गंभीर बाब म्हणजे सोमवारी ...

पुण्यात डिकी चोराचा धुमाकूळ; 6 रिक्षांच्या डिकी उचकटल्या
पुणे: रिक्षाच्या डिकी उचकून आतील रोख रक्कम चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. गंभीर बाब म्हणजे सोमवारी पहाटे देखील डिकी उचकटून सुमारे दहा हजार रुपये लंपास केले.येरवडा येथील गोल्फ क्लब समोर सुभाषनगर येथे दोन दिवस हा धक्कादायक प्रकार सुरू असून परिसरातील नागरिक या डिकीचोरा मुळे चांगलेच धास्तावले आहेत.
सोमवारी (16) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गोल्फ क्लब रस्त्यावरील बुर्हाण क्लास शेजारी घडली. वाघेश्वर डेअरी बाहेर उभ्या असलेल्या निवृत्ती झपके यांच्या रिक्षातील डिकी उचकटून त्यातील अंदाजे दहा हजार रुपये या भामट्याने लांबवले. सलग दुसर्या दिवशी याच ठिकाणी पुन्हा डिकी उचकटून चोरीचा प्रयत्न करीत परिसरातील सात रिक्षांच्या डिकी उचकटून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त करून चोरीचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार वाघेश्वर डेअरी सह अन्य काही सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. येरवडा पोलिसांनी या प्रकाराची माहिती घेऊन या डिकीचोर ठगाचा शोध सुरू केला आहे. या डिकीचोरामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून या भामट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अधिक तपास येरवडा पोलिस करीत आहेत.