शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

पुणे शहरात डिसेंबरमध्ये दस्त नोंदणीत दुपटीने वाढ; तब्बल 7 कोटी 98 लाखांचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 22:17 IST

गुरूवारी दिवसभर सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात प्रचंड गर्दी

ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत सुरू होते दुय्यम निबंधक कार्यालय जानेवारी ते डिसेंबर दरम्यान पुणे शहरात 1 लाख 85 हजार 552 दस्त नोंदणी कोरोना काळात 33 कोटी 97 लाखांचा महसूल 

सुषमा नेहरकर- शिंदे -पुणे :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे गेल्या चार महिन्यांत पुणे शहरात दस्त नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. यात एकट्या डिसेंबर महिन्यात सरासरीच्या दुपट्ट म्हणजे तब्बल 38 हजार 157 दस्त नोंदणी होऊन शासनाला सुमारे 7 कोटी 98 लाखांचा महसूल मिळाला. जानेवारी ते डिसेंबर दरम्यान पुणे शहरात 1 लाख 85 हजार 552 दस्त नोंदणी होऊन त्यातून 33 कोटी 97 लाख ऐवढा महसूल मिळाला आहे. 

बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि त्यात आलेले कोरोनाचे संकट यामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देणे व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ऑगस्ट महिन्यात मुद्रांक शुल्कात दोन टप्प्यांत सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत तीन टक्के , तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत दोन टक्के सवलत देण्यात आली. त्यात  ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन चालान भरल्यानंतर पुढील चार महिने खरेदी विक्रीच्या व्यवहारात तीन टक्के सवलत मिळणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. यामुळे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत दस्त नोंदणीसाठी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांत मोठी गर्दी केली. 31 डिसेंबर रोजी रात्री उशीरा पर्यंत कार्यालये सुरू होती  --------कोरोना काळात 33 कोटी 97 लाखांचा महसूल राज्यात मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मार्च ते मे हे तीन महिन्ये शहरातील दस्त नोंदणी पूर्ण पणे ठप्प होती. परंतु त्यानंतर शासनान दस्त नोंदणीत दिलेल्या सवलतीमुळे या तीन महिन्याची तुट भरून काढली. यामुळेच डिसेंबर अखेर पर्यंत एकट्या पुणे शहरात 1 लाख 85 हजार 552 दस्त नोंदणी होऊन शासनाला 33 कोटी 97 हजार रुपयांचा महसूल मिळाला. ----गर्दीमुळे कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी पुणे शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, मास्क,  सॅनिटायझेशन सर्व नियम धाब्यावर बसवत ही गर्दी केली. ------नागरिकांनी रात्री उशीरापर्यंत रांगा लावून लाभ घेतला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाला दिलासा देण्यासाठी  राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलती आणि ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन चालान भरल्यानंतर पुढील चार महिने खरेदी विक्रीच्या व्यवहारात तीन टक्के सवलतीचा लाभ मिळणार असल्याने नागरिकांनी शेवटची काही दिवस व रात्री उशीरापर्यंत रांगा लावून दस्त नोंदणी केली. यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होती.- अनिल पारखे, मुद्रांक जिल्हाधिकारी ---------जानेवारी ते डिसेंबर दरम्यान झालेली दस्त नोंदणी महिना       दस्त नोंदणी जानेवारी    22556फे ब्रुवारी    20269मार्च          13244एप्रिल       0मे            1080जून           8068 जुलै          9543ऑगस्ट       13284 सप्टेंबर       18032ऑक्टोबर     19248नोव्हेंबर       22061डिसेंबर       38157

टॅग्स :PuneपुणेRevenue Departmentमहसूल विभागState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या