शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मधुमेह, रक्तदाब असणाऱ्या कैद्यांना मुक्त करावे : उच्च न्यायालयाच्या समितीकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 15:29 IST

मोका अंर्तगत अंडरट्रायल असणाऱ्या व 5वर्षांपेक्षाही जास्त काळ असणाऱ्या आजारी कैद्यांना जामीन मिळावा..

ठळक मुद्दे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कारागृह निरीक्षकांना दिले निवेदन

पुणे : कोरोनाची लागण होऊ नये यासाठी कारागृहातील ज्येष्ठ तसेच मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या कैद्यांना सोडण्यात यावे अशी मागणी अ‍ॅड. रश्मी पुरंदरे यांनी उच्च न्यायालयाच्या उच्च स्तरीय समितीकडे केली आहे. आपल्या मागणीची एक प्रत त्यांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग आणि मुख्य कारागृह निरीक्षक यांना दिली आहे. मोका अंर्तगत अंडरट्रायल असणाऱ्या व 5 वषार्पेक्षाही जास्त काळ असणाऱ्या आजारी कैद्यांना जामीन मिळावा अशी मागणी त्या मागणी पत्रात केली आहे. सध्या देशभर कोरोनाचा संसर्ग सुरू असून त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कैद्यांना देखील हा आजार होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा ठोठावलेल्या कैद्यांना सोडण्यात यावे. असा आदेश कारागृह प्रशासनाला दिला आहे. यासाठी 'हाय पावर कमिटी' स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहातील गंभीर गुन्ह्यातील कैद्यांनी आपणाला देखील इतर कैद्यांप्रमाणे सोडण्यात यावे यासाठी उपोषणाला बसण्याचा इशारा देऊन उच्च न्यायालयाला त्यासंबंधीचे पत्र पाठवले. त्यावर ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. अशातच अ‍ॅड. पुरंदरे यांनी कारागृहातील आजारी कैद्यांना देखील याचा लाभ मिळावा अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ७०० हुन अधिक आहे. येरवडा कारागृहातुन ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना सोडण्यात येत आहे. कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक संख्येने कैदी असून त्यांच्यात सोशल डीस्टँसिगचा अभाव दिसून येतो. सध्या सर्व राज्यात मोका अंतर्गत अनेक कैदी कारागृहात आहेत. त्यातील काहींना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास आहे.यावर न्यायालयाने सहानुभूतीने विचार करून ज्या कैद्यांना रक्तदाब व मधुमेह आहे त्याबाबत योग्य ती तपासणी करून शिक्षा न झालेल्या कैद्यांना अटी, शर्तींचे नियम घालून तात्पुरत्या जामिनावर सोडावे. अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. 

* कैदी हे सतत एकमेकांच्या संपर्कात येतात. आता वकील भेट, कौटुंबिक भेट तसेच व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा ही सोशल डीस्टेनसिंगच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. मात्र कारागृहातील कर्मचारी, अधिकारी यांनी पुरेशी काळजी घेतली आहे. तरीदेखील कोरोनाचा धोका टळलेला नाही. सध्या उन्हाळ्यामुळे कैद्यांना पाण्याचा जपून वापर करावा लागत आहे. त्यांना सतत हात धुणे हे सोशल डीस्टेनसिंगमुळे शक्य होताना दिसत नाही. कैद्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव काळजी घेणे गरजेचे आहे. - अ‍ॅड. रश्मी पुरंदरे

* जो अर्ज उच्च न्यायालयात करण्यात आला आहे त्याची एक प्रत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाला माहितीस्तव देण्यात आली आहे. आमच्याकडे त्यासाठी अर्ज करण्यात आलेला नाही. जी प्रकरणे हाय पावर कमिटीच्या निकषात बसतात त्याच प्रकरणांचा विचार जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाच्या वतीने करण्यात येतो. कमिटीच्या निकषानुसार राज्यातील तसेच ज्यांना 7 वर्षापर्यत शिक्षा ठोठावण्यात आली आहे त्यांनाच वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात येते. आगामी काळात कमिटीकडून आणखी कुठले निर्देश आले तर त्यासंबंधी कोर्टाकडे अर्ज करता येईल. - चेतन भागवत (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण)

टॅग्स :PuneपुणेPrisonतुरुंगjailतुरुंगCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसadvocateवकिलCourtन्यायालय