शेलपिंपळगाव येथे धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:41+5:302021-05-15T04:09:41+5:30
कोरोना काळात लसीकरण झाल्यानंतर रक्ताचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने ८० पेक्षा जास्त ...

शेलपिंपळगाव येथे धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात
कोरोना काळात लसीकरण झाल्यानंतर रक्ताचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने ८० पेक्षा जास्त शिव-शंभूभक्तांनी रक्तदान केले आहे. धर्मवीर शंभूराजे दैनिक पूजा समितीतर्फे महाराजांची दैनिक पूजा करण्यात आली.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, लोकनियुक्त सरपंच विद्या मोहिते, भारतीय विद्यार्थी सेनेचे श्रीनाथ लांडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन धर्मवीर शंभूराजे दैनिक पूजा समितीचे सेवेकरी शिलेदार भानुदास साबळे, अॅड. किरण दौंडकर, अजित इंगळे, किरण गायकवाड, किरण पोतले, शिवाजी पोतले, संभाजी दौंडकर, निखिल पोतले, विराज मोहिते, मयूर वाडेकर, विठ्ठल दौंडकर, किरण थिटे, सुहास मोहिते, अंकुश दौंडकर, साहेबराव मोहिते, नवनाथ कोळेकर, संकेत दौंडकर आदींनी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करून यशस्वी केले.
१४ शेलपिंपळगाव
शेलपिंपळगाव येथे धर्मवीर संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करताना.