शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पुन्हा धुमाकूळ: दोघांवर कोयत्याने वार; पळून जाणाऱ्या ९ आरोपींना पाठलाग करत पोलिसांकडून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:19 IST

जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी कमलेश कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला.

किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क|पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून खून करण्यापर्यंत आरोपींची मजल वाढली आहे. कोयते काढून दहशत पसरवणे हा तर नित्याचाच भाग झाला आहे. अशातच धनकवडी परिसरातील काळुबाई मंदिराजवळ आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केले.  त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ आरोपींना सहकारनगर पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. 

मल्लेश पांडुरंग कांबळे (वय ३८), रवी आनंद चव्हाण (वय २०), दत्ता रामचंद्र जाधव (वय २२), सार्थक बाळासाहेब कुडले (वय २०), अक्षय आप्पा मोहिते (वय २४), स्वप्निल गणेश जाधव (वय २०), आणि निरंजन उत्तम देवकर (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समीर अनंता खोपडे यांनी तक्रार दिली आहे. सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी कमलेश कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला. आज याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणून कोयत्याने त्याच्यावर वार केले. त्यानंतर सर्व आरोपी पसार झाले होते. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान पोलीस अंमलदार अमोल पवार आणि महेश मंडलिक यांना आरोपी तीन हत्ती चौकातून धनकवडीच्या दिशेने दुचाकीवरून पळून जात असल्याची माहिती मिळाली होती. 

त्यानंतर सहकारनगर पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी गेले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनीही दुचाकीने पाठलाग करत यातील सर्व आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी कोयत्याने  फिर्यादीला मारहाण केल्याची कबुली दिली. त्यानंतर या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी