शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

‘धमाल गल्ली’चा खराडीतील समारोप दणक्यात, ‘लोकमत’चा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 3:18 AM

डीजेचा ठेका... उत्साहाने भारलेले वातावरण... जल्लोष आणि नृत्य...‘लोकमत’च्या धमाल गल्लीतील ही धमाल महेश विद्यालय येथील न्यू डीपी रोड कोथरूड सोसायटीतील रहिवाशांनी अनुभवली. सापशिडीपासून, बुद्धिबळ, रस्सीखेच, दोरीच्या उड्या, मोपेड राइडपर्यंत सर्व काही जल्लोषमय होते. इथे अवतरला होता सळसळता उत्साह, आनंद आणि बिनधास्तपणा... खळाळत्या जल्लोषाला रिमिक्स गाण्यांचा तडका नाचायला भाग पाडत होता.

 पुणे - मजा-मस्ती आणि लोकमत धमाल गल्ली हे समीकरणच आहे. आळस झटकून धमाल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे स्थानिक, त्यांचे कुटुंबीय व स्टेजवरील डान्स प्रशिक्षकांच्या स्टेप्स पाहून अनुकरण करणारी उत्साही लहान मुले- हेच धमाल गल्लीचे वैशिष्ट्य आहे. गंगाधाम, डी.पी.रोड, औंध, सांगवी व खराडी असा आनंददायी व जल्लोषाने भरपूर असा प्रवास करून ‘धमाल गल्ली’ या उपक्रमाचा समारोप खराडीत झाला. या वेळी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लगी तो छगी’ या चित्रपटातील कलाकारांनीही वर्णी लावली होती. मुख्य कलाकार मिलिंद उके, निकिता गिरिधर व दिग्दर्शक शिवदर्शन साबळे यांनी आपल्या पदलालित्याने धमाल गल्लीतील जल्लोषाला चारचाँद लावले.रविवारची सकाळ खराडी झेन्सार टेक्नॉलॉजीजसमोर, रिलायन्स स्मार्टजवळ, खराडी रोड येथे झालेल्या ‘लोकमत’च्या धमाल गल्लीच्या उपक्रमाने बालचमूंसाठी संस्मरणीय ठरली. या उपक्रमाला पालकांसह लहान मुलांनी प्रचंड गर्दीसह हजेरी लावली. त्यांनी यात विविध खेळांच्या मौजमस्तीची अनोखी पर्वणी अनुभवली. खराडी रोडवर रंगलेल्या धमाल गल्लीत स्केटिंग, फ्लॅश मॉब, रस्सीखेच, आर्ट, क्रॉफ्ट, बॉलिवूड डान्स, क्रिकेट, फेस पेंटिंग, फोटो बुथ इन्स्टंट टॅटू, जेंबे, बँड परफॉर्मन्स, पुणेरी पगडी या कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला.सहभागी झालेले लहान-थोरांना हिरो ड्यूएटतर्फे लकी ड्रॉ घेण्यात आला. या भाग्यवान विजेत्यांना कलाकारांच्या हस्ते चांदीचे नाणे देण्यात आले. खत्री बंधू पुणेकरांच्या पसंतीचे नं. १ मस्तानी व आइस्क्रीम यांच्याकडून उपस्थित २५ भाग्यवान विजेत्यांना आकर्षक कूल-कूल कुपन्स देण्यात आले.हिरो ड्यूएट धमाल गल्ली पॉवर्ड बाय खत्री बंधू पॉट आईस्क्रीम व मस्तानी, जिओ फोन, किड्स एज्युकेशन पार्टनर कोठारी इंटरनॅशनल स्कूल, रोबोटिक्स पार्टनर, इंडिया फर्स्ट रोबोटिक्स पुणे यांच्या सहयोगाने पुणे शहर पोलीस, पुणे शहर वाहतूक शाखा व पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.‘एंजॉय फुल्ली धमाल गल्ली’ या ब्रिदास अनुसरून ‘लोकमत’ने खराडीकरांसाठी राबविलेला उपक्रम अत्यंत आनंददायी आहे, रविवारची इतकी प्रसन्न सकाळ नेहमीच अनुभवता यावी असे वाटते. सातत्याने लोकमत धमाल गल्लीसारख्या नवनवीन संकल्पना आबालवृद्धांसाठी राबविण्यात आल्या पाहिजेत.- महेंद्र पठारे, नगरसेवक‘धमाल गल्ली’ मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हजर असलेली मुले आणि तरुण पाहून मी थक्क झालो. कला, मनोरंजन, मुलांवर चांगले संस्कार त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीचा विकास असा उपक्रम ‘लोकमत’ ने पुणे शहरात सर्व ठिकाणी दरवर्षी आयोजित करावा, यासाठी आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील.- राहुल मुरकुटे, संचालक, हॉटेल भैरवीकोठारी इंटरनॅशनल स्कूल : लोकमत धमाल गल्लीच्या व्यासपीठावर बालचमूंना एकत्रितपणे नृत्य, गेम्स, रोबोटिक्स, संगीत एंजॉय करताना पाहून आनंद वाटतो डिजिटल उपकरणांमध्ये हरवलेली नवी पिढी पुन्हा अशा गोष्टीत ताजीतवानी होऊन गेली.ईषिता घोषाल,कोठारी स्कूल मुख्याध्यापक‘धमाल गल्ली’ ही संकल्पना खरोखरच नावाप्रमाणे आहे. कला, क्रीडा, मजा-मस्ती त्याचबरोबर पारंपरिक जुने खेळ, सापशिडी, बुद्धिबळ, रस्सीखेच, दोरीच्या उड्या, अशा मनोरंजक उपक्रमांमध्ये खत्री बंधूस सहभागी केले यासाठी ‘लोकमत’चे मनपूर्वक आभार!- गिरीश खत्री,खत्री बंधू आईस्क्रीम व मस्तानीचे मालक

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमत