देवराम लांडे यांचा शिवसेनेत प्रवेश

By Admin | Updated: November 15, 2016 03:37 IST2016-11-15T03:37:59+5:302016-11-15T03:37:59+5:30

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांनी मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना कार्याध्यक्ष

Devram Lande's entry into Shivsena | देवराम लांडे यांचा शिवसेनेत प्रवेश

देवराम लांडे यांचा शिवसेनेत प्रवेश

जुन्नर : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांनी मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून लांडे यांचे शिवसेनेत स्वागत केले.
पंचायत समिती उपसभापती अंजनाताई कोरडे यांच्यासह आदिवासी भागातील आजी, माजी सरपंच व कार्यकर्ते यांनी लांडे यांच्यासमवेत शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खेडचे आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख राम गावडे, अविनाश रहाणे, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश कवडे, महिला आघाडीच्या श्रद्धा कदम, तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लांडे यांनी महिन्यापूर्वीच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. आदिवासी भागात लांडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या राजकीय रणनीतीमुळे काँग्रेसला पंचायत समितीचे उपसभापतिपद राखण्यात यश आले होते.(वार्ताहर)

Web Title: Devram Lande's entry into Shivsena