शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘कामायनी’च्या देवेंद्रने पटकावले अमेरिकेत पदक

By admin | Updated: August 17, 2015 02:33 IST

देवेंद्र हा लहानपणापासून मतिमंद होता. वडील हयात नव्हते. तरीही आईने खचून न जाता धुण्या-भांड्यांची घरकामे करून देवेंद्रसह तीन मुलांना वाढविण्यासाठी कष्ट उपसले

हणमंत पाटील, पुणेदेवेंद्र हा लहानपणापासून मतिमंद होता. वडील हयात नव्हते. तरीही आईने खचून न जाता धुण्या-भांड्यांची घरकामे करून देवेंद्रसह तीन मुलांना वाढविण्यासाठी कष्ट उपसले. याच देवेंद्रने अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे नुकत्याच झालेल्या विशेष आॅलिम्पिक स्पर्धेत स्केटिंगमध्ये रौप्य व कांस्यपदक पटकावून आईच्या कष्टाचे चीज केले. गोखलेनगर येथील विशेष मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेत देवेंद्र सुनील डेंगळे (वय २२) शिकत आहे. विशेष मुलांमध्ये त्यांची गणना होत असली, तरी कोणतेही काम तो एकग्रतेने व जिद्दीने करतो. या गुणाची पारख शिक्षकांनी केली. त्याला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्केटिंगची त्याला विशेष आवड होती. त्यामुळे कामायनीचे क्रीडाशिक्षक दैवत लिमन यांनी देवेंद्रला स्केटिंगसाठी प्रोत्साहन दिले. मात्र, देवेंद्र विशेष मुलगा असल्याने त्याला स्केटिंगसारखा साहसी क्रीडा प्रकार जमेल का, अशी शंका व चिंता त्याच्या कुटुंबीयांना होती. देवेंद्रचे वडील तो लहान असताना वारले. मात्र, एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे चुलते सुधीर डेंगळे यांनी त्याची जबाबदारी घेतली. सुधीर हे पुणे महापालिकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक व कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे गेल्या वर्षभरात देवेंद्रची निवड चेन्नई, हैदराबाद व उत्तर प्रदेश येथील क्रीडा शिबिरामध्ये झाली. त्या ठिकाणी स्केटिंगसाठी त्याला प्रशिक्षण देण्यात आले. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने आहारासाठी विशेष लक्ष द्यावे लागत आहे. देवेंद्रला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाल्यास त्याचा आर्थिक प्रश्न सुटेल, असे कामायनीचे क्रीडाशिक्षक दैवत लिमन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.