शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं गाणं येणार; अमृता फडणवीस यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 15:01 IST

देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं गाणं अजय - अतुल यांनी संगीतबद्ध केले असून मीसुद्धा त्यामध्ये गायले आहे

पुणे: अमृता फडणवीस यांची गायकी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या गायनाला उदंड प्रतिसाद मिळतोय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा गाणं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस यांचं गाणं प्रसिद्ध होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी दिली आहे. पुण्यात नमो वॉकेथॉन वॉक फॉर नेशन या कार्यक्रमासाठी त्या पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. 

अमृता फडणवीस म्हणाल्या, श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी गाणे लिहिले आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. आणि त्यात मी देखील गायले आहे. आज पहिल्यांदाच मी हे सांगत आहे. हे गाणं लवकरच रिलीज होईल. उद्या अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशात हा उत्सव दिवाळीप्रमाणे साजरा होत आहे. याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार ही  सुखाची बाब आहे. भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे स्वप्न पूर्ण होणार, योग्य निर्णय घेतल्यामुळे होत आहे. उद्धव ठाकरे उद्याचे निमंत्रण असूनही कार्यक्रमाला येणार नाहीत. याबाबत अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. देशाचे वातावरण राममय झाले आहे. मला उद्धव ठाकरे यांच्या विषयी काही बोलता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. काँग्रेसबाबत बोलताना अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, देवेंद्र जी यांनी म्हटले आहे की मोदीजी म्हणाले की, काँग्रेस चांगलं काम करत आहे. तरीही ते म्हणतील चुकीचं आहे हे, त्यामुळे त्यांचं कामचं प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचं आहे. 

अमृता फडणवीस यांनी महिलांना आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, हा खूप चांगला उपक्रम आहे. हि ऊर्जा पुण्यातील स्त्रियांमध्ये असू शकते. सकाळी उठून स्वतःकडे लक्ष द्या. मी देते म्हणून मी चमकते तुम्ही लक्ष द्या तुम्हीही चमकाल. असा विश्वास त्यांनी महिलांना दिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीसmusicसंगीतartकला