शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole: मालवण, बदलापूरातील आरोपींशी फडणवीस, रश्मी शुक्ला यांचा काही ना काही संबंध - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:56 IST

बदलापूर येथील अत्याचार प्रकरण व मालवणातील शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांमध्ये पडणे हे दोन्ही प्रकार गंभीर आहेत

पुणे: बदलापूर व मालवण येथील प्रकरणांमधील संशयित विशिष्ट पक्षाबरोबर संबधित आहेत. त्यांचा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला याचा परस्परांशी काही ना काही संबध आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

पक्षाच्या बैठकीसाठी पटोले बुधवारी पुण्यात आले होते. बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, बदलापूर येथील अत्याचार प्रकरण व मालवणातील शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांमध्ये पडणे हे दोन्ही प्रकार गंभीर आहेत. छत्रपतींचा पुतळा पडणे हा तर महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अस्मितेला धक्काच आहे.

मालवणातील पुतळ्याचे काम नवोदित शिल्पकाराला देण्यात आले. तो फरार आहे. बदलापूर मध्ये आरोपी सापडला, पण तो प्रकार ज्या शाळेत घडला, ज्या संचालकांनी प्रकरण धडपण्याचा प्रयत्न केला त्या शाळेचे संचालक फरार आहेत. पोलीसांना ते सापडत नाहीत हे आश्चर्य आहे. एका पक्षाशी संबधित हे लोक आहेत. फडणवीस व रश्मी शुक्ला आणि या पक्षाशी संबधित संशयित आरोपी यांचे कनेक्शन आहे. त्याशिवाय आरोपी फरार होऊ शकत नाहीत. पोलीसांनी या दिशेने तपास करावा, त्यातून हे संबध उघडकीस येतील नवोदित शिल्पकाराला काम देण्यासाठी कोणी दबाव आणला व शाळेच्या संचालकांना कोण पाठीशी घालते आहे हे यातून उघड होईल असे पटोले म्हणाले.

अशा गोष्टींवर बोलणे म्हणजे राजकारण करणे नाही. सत्ताधार्याकडून विरोधकांवर असा आरोप होतो आहे, तो चुकीचा आहे. विरोधकांना त्यांची भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आहे असे पटोले म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRashmi Shuklaरश्मी शुक्लाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज