शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो; नारायण राणेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 12:40 IST

भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात त्याप्रमाणे आम्ही फडणवीस यांचा आदेश पाळला

पुणे : पुण्याच्या सिम्बॉयसिस महाविद्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम सेंटरला पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटरला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज भेट दिली. त्यानंतर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज आपल्याला मंत्रिपद कसे मिळाले याचा खुलासा केला. 

राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की, तुम्ही दिल्लीत जा आणि सुखी राहा. भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात त्याप्रमाणे आम्ही फडणवीस यांचा आदेश पाळला. दिल्लीला गेलो आणि आता केंद्रीय मंत्री पदावर आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीर पासून सुरुवात केली. त्यानंतर आसाम आणि अनेक राज्ये फिरलो. माझ्या आठ नऊ महिन्यांच्या काळात आठ ते नऊ राज्य फिरत पुण्याला आलो आहे. 

दर महिन्याला पुण्याला येणारा माणूस आज चार महिन्यानंतर पुण्याला आला. आणि त्याला कारण व्यासपीठावर बसलेले देवेंद्र फडणवीस हे आहेत. पण आता आनंद आहे, आम्ही आता मित्र आहोत. त्यांनी आम्हाला दिल्लीला पाठवलं त्याचा वेगळा आनंद आहे. महाराष्ट्रात असताना मुख्यमंत्री झालो विरोधी पक्षनेते पद सांभाळलं  राज्य सरकारच्या अधिकारानुसार फडणवीस यांनी आरक्षण दिले होते 

''मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात फार आंदोलन झाली, विरोधी पक्षांनीही तेव्हा भारतीय जनता पक्षावर, तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फार टीका केली.  देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण हे घटनेत बसत नाही, आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा यासारख्या अनेक मागण्या विरोधकांनी लावून धरल्या होत्या. तेव्हा मी महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील तज्ज्ञांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी मला सांगितले की घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चार कलमानुसार मागासलेल्या वर्गाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणीस त्यांनी आरक्षण दिलं होतं. घटनेनुसार मागास वर्गाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.''

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षण