शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

त्यावेळी आम्ही तिघेही वेगळ्या पदावर होतो, विकासासाठी आज एकत्र आहोत- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे आणि पीएम आवास योजनेचे लोकार्पण पार पडले...

पुणे : सध्याचे राज्य सरकार हे तीन इंजिनचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देशाचा विकास वेगवान होत आहे. सामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम देशाचे पंतप्रधान करत आहेत. मोदींच्या हस्ते मिळणारे घर विकण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवा, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे आणि पीएम आवास योजनेचे लोकार्पण पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यातील मागील मेट्रोच्या उद्घाटनावेळी मी, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान होते. पण त्यावेळी आम्ही तिघेही वेगळ्या पदावर होतो. मी विरोधी पक्ष नेता होतो, दादा उपमुख्यमंत्री होते आणि शिंदे हे नगरविकास मंत्री होते. पण आज विकासासाठी आम्ही सर्व जण एकत्र आहोत आणि वेगळ्या पदावर आहोत. आगामी काळात एकही व्यक्ती बेघर राहणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पुणे ही जशी उद्योग नगरी आहे तशीच स्वप्न पूर्ण करणारी नगरी म्हणूनही आम्ही पुण्याचा विकास करू, असंही फडणवीस म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनेही पंतप्रधानांच्या कामाचे कौतुक केले. शिंदे म्हणाले, टिळक पुरस्कारामुळे मोदींच्या कार्याला आणखी बळ मिळेल. पंतप्रधान राज्यात येतात तेंव्हा काम करण्याचे बळ मिळते. समविचारी सरकार असल्यावर कामाला वेग येतो. आयोध्येचे मंदिर बांधण्याचे काम किंवा काश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याचे काम मोदींनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे