पालिका भवनाचे होणार विस्तारीकरण
By Admin | Updated: June 29, 2014 22:52 IST2014-06-29T22:52:28+5:302014-06-29T22:52:28+5:30
महापालिका हद्दीत नव्याने 34 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पालिका भवनाचे होणार विस्तारीकरण
>पुणो : महापालिका हद्दीत नव्याने 34 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही गावे समाविष्ट झाल्यानंतर पुणो महापालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार असली तरी, पालिकेचे विभाजन होणार की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, ही गावे समाविष्ट झाल्यानंतर प्रशासकीय कामांचा भार आणि नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पालिकेच्या मुख्य भवनाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावास शहर सुधारणा समितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी आणि नगरसेवक महेंद्र पठारे यांनी हा प्रस्ताव समितीपुढे ठेवला होता. त्यानुसार, भवनाच्या मागील बाजूस असलेल्या निवडणूक कार्यालयाच्या जागेत ही इमारत आणि नवे सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या अंतिम मान्यतेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
जागेअभावी पालिकेची काही कार्यालये मुख्य भवनाच्या इमारतीव्यतिरिक्त सुरू आहेत. ही गावे आल्यानंतर आणखी कार्यालयांची गरज पालिकेस भासणार आहे. मात्र, जागा उपलब्ध नसल्याने ही नवी कार्यालये इतरत्र निर्माण केल्यास अनेक अडचणींचा सामना प्रशासनास करावा लागणार आहे. त्यामुळे
नव्या इमारतीचा प्रस्ताव
ठेवण्यात आला होता. त्यानुसार, मुख्य भवनाच्या मागील बाजूस असलेल्या पार्किंगच्या जागेतील निवडणूक कार्यालयाच्या ठिकाणी
ही नवीन इमारत व सभागृह
बांधण्यास शहर सुधारणा
समितीने एकमताने मान्यता
दिली आहे. (प्रतिनिधी)
च्राज्यशासनाने महापालिका हद्दीत नव्या गावांच्या समावेशाच्या हालचाली सुरू केल्या आहे. ही गावे समाविष्ट झाल्यानंतर महापालिका प्रशासनाचा भारही वाढणार आहे.
च्भविष्यात ही कार्यालये महत्त्वाची ठरणार असल्याने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून, लवकरात लवकर स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या मान्यतेने नंतर तो मार्गी लावण्यात येणार असल्याचे कर्णे यांनी सांगितले.