दौंड परिसरातील दारूभट्ट्या उद्ध्वस्त
By Admin | Updated: February 15, 2017 01:45 IST2017-02-15T01:45:08+5:302017-02-15T01:45:08+5:30
येथील गोवा गल्लीत वेगवेगळ््या ठिकाणी गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून ४ महिलांवर गावठी दारूविक्रीप्रकरणी गुन्हे दाखल

दौंड परिसरातील दारूभट्ट्या उद्ध्वस्त
दौंड : येथील गोवा गल्लीत वेगवेगळ््या ठिकाणी गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून ४ महिलांवर गावठी दारूविक्रीप्रकरणी गुन्हे दाखल केले असल्याची माहिती ठाणे अंमलदार संतोष सुपेकर यांनी दिली.
या कारवाईत २१ हजार ८०० रुपयांचे दारू तयार करण्याचे साहित्य आणि तयार दारू असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कल्पना जाधव, बबिता जाधव, संगीता जाधव आणि जयश्री लोभे (चौघी रा. गोवा गल्ली, दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर, उपनिरीक्षक गजानन जाधव, संजय नीलपत्रेवार, गजानन जाधव यांच्यासह पोलीस पथकाने भाग घेतला.